मुंबई : (CM Devendra Fadnavis) खा. संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि संजय राऊत यांची भेट मंगळवार दि.२ रोजी झाली. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे देखील उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यात तब्बल २० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते. येणाऱ्या मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर या भेटीचे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.(CM Devendra Fadnavis)
संजय राऊत यांनी आजारपणामुळे दोन महिने सक्रिय राजकारण आणि पत्रकार परिषद बंद केली होती. पण एक महिन्यातच ते पुन्हा सक्रिय दिसले. "आपल्या आजारपण काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आपली आस्थेने चौकशी केली."असेही ते पत्रकारांना बोलले होते.
हेही वाचा : Asiatic Elections : मतदार यादी अद्ययावत होईपर्यंत एशियाटिकची निवडणूक लांबणीवर!
यानंतर बुधवार दि.३ रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. त्यामुळे मंगळवार आणि बुधवार हे दोन दिवस राजकीय चर्चांना उधाण आले होते. एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीत संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची आहे तर दुसरीकडे राऊत यांनी काँग्रेसवर पण टीका केली होती. भाजपाने मुंबई महापालिकेसाठी जोरदार तयारी केली असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) स्वतः लक्ष ठेऊन आहेत.(CM Devendra Fadnavis)