Amit Shah : आसाम घुसखोरमुक्त करणारच! अमित शाह यांचा नागावमध्ये ठाम निर्धार

29 Dec 2025 21:06:33
Amit Shah

दिसपूर : (Amit Shah) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आसाममधील नागाव येथे बोलताना, “आमचे सरकार संपूर्ण आसामला घुसखोरांपासून मुक्त करणार” असा ठाम निर्धार व्यक्त केला. गुवाहाटी येथे नवनिर्मित हुतात्मा स्मारकाला भेट देत आसाम आंदोलनातील हुतात्म्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अवैध परदेशी नागरिक हे केवळ आसामच्या संस्कृतीसाठीच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर धोका असल्याचं अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्ट केले.(Amit Shah)
 
अमित शाह (Amit Shah) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, "काँग्रेसने आसाम आंदोलनातील हुतात्म्यांची नेहमीच उपेक्षा केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आसाममध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या डबल इंजिन सरकारने या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारले आहे. गोपीनाथ बारदोलोई यांनी पंडित नेहरूंना आसाम हा भारताचा अविभाज्य भाग म्हणून कायम ठेवण्यासाठी भाग पाडले. ते नसते, तर आज आसाम भारताचा भाग राहिला नसता."(Amit Shah)
 
हेही वाचा : India-Australia Trade : १ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय निर्यातीवर शून्य शुल्क; केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची माहिती
 
"भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे जो घुसखोरांना भारतासाठी धोका मानतो. त्यामुळे केवळ भाजपच घुसखोरीमुक्त भारत घडवू शकतो. काँग्रेसने बेकायदेशीर स्थलांतरित (न्यायालयाद्वारे निर्धार) अधिनियम, १९८३ [IMDT - Illegal Migrants (Determination by Tribunals) Act, 1983] हा कायदा आणून आसाममध्ये घुसखोरांना स्थायिक होण्याचा मार्ग खुला केला. मात्र, भाजप सरकार आसामसह संपूर्ण देशातून घुसखोरांना शोधून बाहेर काढेल."(Amit Shah)
 
या दौऱ्यात अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते विविध विकासप्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आले. तसेच गुवाहाटीतील पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं आणि शहराच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सिस्टिमचं उद्घाटनही केले. या कार्यक्रमाला आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा उपस्थित होते.(Amit Shah)
 
Powered By Sangraha 9.0