मुंबई : (Young Curators Program 2025) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय येथे चिल्ड्रन्स म्युझियमतर्फे तीन दिवसीय 'यंग क्युरेटर्स’ प्रोग्राम २०२५ (Young Curators Program 2025) उत्साहात संपन्न झाला. दि. २७ डिसेंबर ते दि. २९ डिसेंबर या कालावधीमध्ये या उपक्रमात १० ते १७ वयोगटातील मुंबईतील विविध शाळांमधून निवडलेले २० विद्यार्थी सहभागी झाले होते. (Young Curators Program 2025)
हेही वाचा : Dr. Sanjay Joshi : डॉ. संजय जोशी 'चौथे छत्रपती शिवाजी महाराज' साहित्य पुरस्काराने सन्मानित
या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश मुलांना क्युरेटर (Young Curators Program 2025) म्हणून स्वतःची भूमिका अनुभवता यावी तसेच प्रत्यक्ष संग्रहालयातील वस्तूंच्या क्युरेशनच्या माध्यमातून इतिहास व संस्कृतीशी त्यांचे नाते अधिक दृढ व्हावे हा होता. तीन दिवसांच्या कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना संग्रहालयातील निवडक वस्तूंचा अभ्यास, संशोधन, मांडणी व सादरीकरण याबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान संग्रहलयात आयोजित करण्यात आलेल्या सत्रामध्ये तरुण सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या सत्रातून त्यांनी संग्रहालयीन संकल्पना, कथन पद्धती आणि वस्तूंच्या मागील इतिहासाचा सखोल अभ्यास केला. प्रश्नोत्तर, चर्चा आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कल्पकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला. 'यंग क्युरेटर्स’ प्रोग्राम २०२५ (Young Curators Program 2025) मुळे सहभागी विद्यार्थ्यांना केवळ संग्रहालय पाहण्यापुरते न राहता, त्याच्या मागील संकल्पना समजून घेण्याची आणि त्या प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळाली. या उपक्रमामुळे भविष्यातील पिढीमध्ये संग्रहालये, वारसा आणि संस्कृतीविषयी संवेदनशीलता निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. (Young Curators Program 2025)