मुंबई : (Pravin Darekar) शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबईच्या जिल्हाध्यक्षा राखी जाधव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेश केल्यानंतर यावेळी भाजप गटनेते आ. प्रवीण दरेकर,(Pravin Darekar) आ. प्रसाद लाड हे राखी जाधव यांच्यासह उपस्थित होते. यावेळी आ. प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी उबाठा गटावर खरमरीत टीका केली.(Pravin Darekar)
यावेळी माध्यमांशी बोलताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, केवळ उमेदवारी मिळावी म्हणून कोणी भाजपमध्ये येत नाही. तर विकासाचे राजकारण जे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसेच मुंबईचा चेहरा-मोहरा जे काही बदलत आहे. राखी जाधव या कुठल्याही पक्षातल्या असल्या तरी त्या ग्राउंडवरच्या कार्यकर्त्या आहेत. हे आपण बघितले आहे की त्या जनतेमध्ये राहिलेल्या कार्यकर्त्या आणि नेत्या आहेत. राखी जाधव यांना खात्री होती की, माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा विकास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विकासाचे राजकारण करूया. कारण शेवटी पक्ष नेते, हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची अध्यक्षा आज मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार आणि पराग शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्या ज्या पक्षात चांगली लोकं आहेत, ज्यांना राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे, ज्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, ती सगळी लोकं भाजपमध्ये येत आहेत. विकास कोण करू शकते तर भाजप करू शकते, त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश होत असल्याचेही दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.(Pravin Darekar)
यावेळी उद्धव ठाकरे गटावर टीका करताना आ. दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, ठाकरेंचा विश्वास आता मराठी माणसावर, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्यांना मराठी माणसाची आणि हिंदूंच्या मतांची परवा नाही. तर राज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना दरेकर म्हणाले की, मुंबईकडे आमचे लक्ष आहे, देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष मुंबईकडे आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री आहेत. गेल्या काही वर्षात मुंबईचा चेहरा बदलतोय ते मुंबईकडे देवाभाऊंचे, पंतप्रधान मोदींचे लक्ष असल्यामुळेच. २५ वर्षात तुम्ही काय केले हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे राज ठाकरेंचे विधान वैफल्यातून आले असल्याची टीकाही दरेकरांनी (Pravin Darekar) केली.(Pravin Darekar)
आमच्यात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही
दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, आमच्यात कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही. भाजपा सर्व बाजूने समतोल साधत, मराठीचा सन्मान करतच मुंबई, महाराष्ट्राचे राजकारण करतेय आणि करत राहील. ज्यावेळी पूर्ण यादी समोर येईल त्यावेळी विरोधकांना जे वाटतेय त्यांचा भ्रमनिरास होईल.(Pravin Darekar)