मुंबई : (Ameet Satam) आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई भाजपाच्या वसंत स्मृती या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक पार पडली.(Ameet Satam)
"आगामी निवडणुकांसाठी संघटना अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. या प्रसंगी वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील तयारी, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे तसेच जनतेपर्यंत विकासकामांची माहिती प्रभावीपणे पोहोचवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली." असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी केले.
या बैठकीस राष्ट्रीय महामंत्री (संगठन ) बी. एल. संतोष, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश , भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे, कॅबिनेट मंत्री व निवडणूक प्रभारी ॲड. आशिष शेलार , महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांसह, मुंबईतील सर्व आमदार तसेच पक्षाचे सर्व सरचिटणीस उपस्थित होते.(Ameet Satam)