BJP : भाजपने तिकीटासाठीची फुटाफुट रोखली;

29 Dec 2025 20:47:21
BJP
 
मुंबई : (BJP) मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) पहिली ६६ नावांची यादी जाहीर करण्यात आली असून १२५ जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. दरम्यान, भाजपने (BJP) ऐन निवडणुकीत तिकीटासाठी होणारी फुटाफुट रोखली असून सर्वांना समान न्याय आणि नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे.(BJP)
 
भाजपच्या (BJP) पहिल्या यादीत तेजस्वी घोसाळकर, सरचिटणीस गणेश खणकर, मनिषा यादव, मिलिंद शिंदे, आकाश पुरोहित यांचाही समावेश आहे. विशेषतः यावेळी भाजपने नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. यात मुलुंड पश्चिम (वॉर्ड क्रमांक १०७) मधून डॉ.नील सोमय्या, वॉर्ड क्रमांक ४७ मधून तेजिंदर सिंग तिवाना, वॉर्ड क्रमांक ९ मधून माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना पुन्हा संधी दिली असून भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन मानखुर्दमधील प्रभाग क्रमांक १३५ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.(BJP)
 
भाजपने (BJP) निवडणुकीची तयारी खूप आधीपासून सुरू केली असून, नुकत्याच आलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालात क्रमांक एकचा पक्ष म्हणून बाजी मारली. तीच कामगिरी पक्षाला मुंबई महापालिका निवडणुकीत कायम ठेवायची आहे. मुंबईत नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला विरोध करून भाजपने राष्ट्रवादीसोबत युती नाकारली आहे, यातून आपले हिंदुत्ववादी विचार कायम आहेत, हा संदेश दिला.
 
हेही वाचा : भाजपकडून 'या' मराठी अभिनेत्रीला मिळाली उमेदवारी
 
मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न - अमीत साटम
 
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरेंनी हिरव्या रंगाची चादर ओढून घेतली आहे. बॉम्बस्फोटातील आरोपी त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करतो, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा प्रचारात दिल्या जातात. रशीद मामूंची टोळी मुंबईत कार्यरत झाली असून मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, भाजप, शिवसेना आणि रिपाइं महायुती हे सर्व प्रयत्न फोल ठरवेल," अशी टीका भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी केली.
 
पालिकेत झळकणार युवा नेतृत्व
 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे (BJP) काही ठिकाणी जुने, अनुभवी चेहरे, तर काही वॉर्डमध्ये तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत युवा उमेदवारांवर भाजपचा भर स्पष्टपणे दिसून येतो. संघटनात्मक काम, स्थानिक प्रश्नांची जाण आणि मैदानात उतरून काम करण्याची तयारी असलेल्या चेहऱ्यांना तिकीट देण्यात आले. तसेच यावेळी महिला प्रतिनिधित्वालाही महत्त्व देत, काही महत्त्वाच्या वॉर्डमध्ये महिला उमेदवारांवर भाजपने विश्वास दाखवला आहे.
 
Powered By Sangraha 9.0