मुंबई : (Maharaja Sayajirao University) वडोदरा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाने (Maharaja Sayajirao University) राष्ट्रीय शिक्षण धोरण (एमएसयू) - २०२० अंतर्गत सुरू केलेल्या नवीन बीए (इंग्रजी) लघु अभ्यासक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संघकामातील आठवणींचे लिहलेले ज्योतीपुंज हे पुस्तक शिकवले जाणार आहे. विद्यापीठाच्या (Maharaja Sayajirao University) कला विद्याशाखेच्या इंग्रजी विभागात अॅनालिसिस अँड अंडरस्टँडिंग ऑफ नॉन-फिक्शनल रायटिंग्ज ऑन इंडिया या नवीन अभ्यासक्रमात हे शिकवले जाईल.(Maharaja Sayajirao University)
त्याचबरोबर या अभ्यासक्रमात अरबिंदो आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निवडक कलाकृती, स्वामी विवेकानंदांची पुस्तके आणि पंतप्रधानांचे रेडिओ भाषण मन की बात चे निवडक भाग देखील शिकवले जातील. या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट राष्ट्रवाद, सांस्कृतिक विचारसरणी आणि भारतीय बौद्धिक परंपरा जोपासणे असा आहे.(Maharaja Sayajirao University)
महाराजा सयाजीराव विद्यापीठ (Maharaja Sayajirao University) भारतीय मूल्य जपण्यासाठी विविध अभ्यासक्रमांची भरती करत असते. २०२३ मध्ये विद्यापीठात संस्कृत साहित्यावरील अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दाखवला होता. त्याच धर्तीवर स्वा. सावरकरांचे आत्मचरित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ज्योतीपुंज हे पुस्तक शिकवले जाणार आहे.(Maharaja Sayajirao University)
विद्यापीठाच्या कला विद्याशाखेतील इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. हितेश डी. रविया यांच्या मते, हा अभ्यासक्रम राष्ट्रीय विचारवंतांवर लक्ष केंद्रित करणारा असेल. या अभ्यासक्रमाची रचना चार भागात केली आहे. तिसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात एकूण साठ तासांसाठी अभ्यासक्रम शिकवला जाईल. पहिल्या भागात नरेंद्र मोदींच्या ज्योतिपुंज वर आधारित चरित्रात्मक लेखनाचा अभ्यास केला जाईल. तर दुसऱ्या भागात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मचरित्र असलेले 'शत्रूच्या शिबिरात' हे पुस्तक शिकवले जाईल. तिसऱ्या भागात अरबिंदो यांच्या 'द रेनेसान्स इन इंडिया' आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 'इंटिग्रल ह्युमॅनिझम' मधील निवडक निबंध आणि व्याख्याने तर चौथ्या भागात स्वामी विवेकानंदांच्या 'द ईस्ट अँड द वेस्ट' आणि 'मन की बात' मधील निवडक भाषणे शिकवली जातील. एकूण ६३ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे.(Maharaja Sayajirao University)