India-Australia Trade : १ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय निर्यातीवर शून्य शुल्क; केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

29 Dec 2025 20:34:57

India-Australia Trade

नवी दिल्ली : (India-Australia Trade)
भारतातून ऑस्ट्रेलियाला निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर १ जानेवारीपासून कोणतंही शुल्क आकारले जाणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केली आहे. या निर्णयामुळे देशातील कामगारप्रधान क्षेत्रांसाठी निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(India-Australia Trade)
भारत–ऑस्ट्रेलिया वित्तीय सहकार्य आणि व्यापार कराराच्या (ECTA) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना गोयल यांनी सांगितलं की, या करारामुळे दोन्ही देशांमधील निर्यातीत लक्षणीय वाढ, बाजारपेठा अधिक खुल्या होणे आणि पुरवठा साखळी मजबूत होण्यास मदत झाली आहे.(India-Australia Trade)
वर्ष २०२४–२५ मध्ये भारताची ऑस्ट्रेलियाकडे निर्यात सुमारे ८ टक्क्यांनी वाढली असून, रत्न आणि आभूषण क्षेत्रात १६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. याशिवाय कृषी उत्पादनं, मसाले, कॉफी आणि सागरी उत्पादनांची निर्यातही वाढली असल्याचे त्यांनी नमूद केले.(India-Australia Trade)
 
 
Powered By Sangraha 9.0