Dr. Sanjay Joshi : डॉ. संजय जोशी 'चौथे छत्रपती शिवाजी महाराज' साहित्य पुरस्काराने सन्मानित

29 Dec 2025 13:52:33
Dr. Sanjay Joshi

मुंबई : (Dr. Sanjay Joshi) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहिल्यानगर या संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती ग्राहक भांडार यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ (Dr. Sanjay Joshi) देण्यात येणाऱ्या राज्य साहित्य पुरस्कार-२०२५ या अत्यंत मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पुरस्काराचा वितरण सोहळा अहिल्यानगर येथे नुकताच संपन्न झाला. या पुरस्कारासाठी संस्थेने २०२४ या वर्षांत प्रकाशित झालेल्या विविध साहित्य प्रकारातील पुस्तके पाठवण्याचे आवाहन केले होते. यासाठी देश-विदेशातून एकूण १८० लेखक–प्रकाशकांनी पुस्तके पाठवली होती. परिक्षक मंडळाने यातून एकूण आठ पुस्तकांची अंतिम निवड या पुरस्कारासाठी केली. यात विज्ञान विभागासाठी ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पर्यावरण लेखक डॉ. संजय जोशी (Dr. Sanjay Joshi) लिखित आणि ठाण्यातील सृजनसंवाद प्रकाशन प्रकाशित 'कथा जैवविविधतेची.. प्रवास जीवसृष्टीचा' या पुस्तकाची निवड करण्यात आली होती.(Dr. Sanjay Joshi)
 
हेही वाचा : BMC Election : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, एबी फॉर्मचे वितरण, कोणा-कोणाला उमेदवारी?
 
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रेरणेने १९१८ साली स्थापन झालेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या शिक्षण संस्थेच्या अहिल्यानगर येथील न्यू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या एका भव्य, दिमाखदार, शाही सोहोळ्यात ख्यातनाम नाट्यकर्मी आणि ९९ व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष, सुप्रसिध्द नाट्यलेखक श्री. प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते डॉ. संजय जोशी (Dr. Sanjay Joshi) यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम रू. दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार समितीचे संयोजक प्रा. गणेश भगत तसेच भांडार अध्यक्ष प्रा. रवींद्र देवढे त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने छत्रपतींच्या नावाला साजेशा या शाही सोहळ्याचे दिमाखदार आयोजन केले होते.यापूर्वी 'कथा जैवविविधतेची' या पुस्तकासाठी डॉ. जोशी (Dr. Sanjay Joshi) यांना मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे यांचा 'श्रीस्थानक पुरस्कार', मराठा मंदिर साहित्य पुरस्कार तसेच अखिल भारतीय प्रकाशक संघाच्या उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.(Dr. Sanjay Joshi)
 
Powered By Sangraha 9.0