भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींच्या शस्त्रखरेदीला मंजुरी

29 Dec 2025 21:41:47

DAC meeting

नवी दिल्ली : (DAC meeting) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दि. २९ डिसेंबर रोजी संरक्षण अधिग्रहण परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तीनही सशस्त्र दलांसाठी शस्त्र आणि आधुनिक उपकरणांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली असून, यासाठी ७९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.(DAC meeting)

या मंजूर खरेदीत भारतीय लष्करासाठी आवश्यक शस्त्रसामग्री, आधुनिक रडार्स, लांब पल्ल्याचे रॉकेट, पिनाका बहुउपयोगी रॉकेट प्रणाली, तसेच ड्रोन डिटेक्शन प्रणाली यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे देशाची संरक्षण क्षमता अधिक बळकट होणार आहे.(DAC meeting)

भारतीय नौदलासाठी बोलार्ड पुल टग्ज, सॉफ्टवेअर चालित उच्च ध्वनीलहरींचे रेडिओ मॅनपॅक आणि अति उंचावरील लांब पल्ल्याची विमान प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे बंदरांतील जहाजांच्या हालचाली सुलभ होणार असून, सुरक्षित संवाद आणि हिंदी महासागर क्षेत्रात सातत्यपूर्ण देखरेख शक्य होणार आहे.(DAC meeting)

भारतीय हवाई दलासाठी स्वयंचलित टेक-ऑफ व लँडिंग रेकॉर्डिंग प्रणाली, अस्त्र Mk-II क्षेपणास्त्रे, तेजस विमानासाठी फुल मिशन सिम्युलेटर आणि स्पाइस-1000 मार्गदर्शक संचाच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली. या निर्णयांमुळे हवाई दलाची सुरक्षा, प्रशिक्षण आणि अचूक माऱ्याची क्षमता अधिक वाढणार आहे.(DAC meeting)


Powered By Sangraha 9.0