BMC Election : ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, ४० उमेदवारांना संधी

29 Dec 2025 14:06:50
 
BMC Election
 
मुंबई : (BMC Election) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या टप्प्यात सुमारे ४० ते ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अनुभवी माजी नगरसेवकांसह तरुण आणि नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे. (BMC Election)
 
रविवार दि. २८ डिसेंबर, मध्यरात्रीपासून मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले. ज्या प्रभागांमध्ये कोणताही वाद किंवा अंतर्गत मतभेद नाहीत, अशा जागांवरील उमेदवारांची नावे पहिल्या यादीत समाविष्ट करण्यात आली असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. (BMC Election)
 
हेही वाचा :  BMC Election : भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, एबी फॉर्मचे वितरण, कोणा-कोणाला उमेदवारी?
 
पहिल्या यादीतील प्रमुख उमेदवार
 
रोशनी कोरे गायकवाड – प्रभाग ३ 
सचिन पाटील – प्रभाग २९
सुहास वाडकर – प्रभाग ४०
संगीता सुतार – प्रभाग ४९
अंकित प्रभू – प्रभाग ५४
रोहन शिंदे – प्रभाग ५७
शैलेश फणसे – प्रभाग ५९
मेघना विशाल काकडे माने – प्रभाग ६०
सेजल दयानंद सावंत – प्रभाग ६१
झिशान चंगेज मुलतानी – प्रभाग ६२
देवेंद्र बाळा आंबेडकर – प्रभाग ६३
सभा हारून खान – प्रभाग ६४
प्रसाद आयरे – प्रभाग ६५
गीतेश राऊत – प्रभाग ८९
हरी मिस्त्री – प्रभाग ९५
दीपक सावंत – प्रभाग १११
श्वेता पावसकर – प्रभाग ११७
सकीना शेख – प्रभाग १२४
 
दरम्यान, दादर, वरळी, शिवडी आणि माहिम यांसारख्या मराठी बहुल व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रभागांतील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, अशी माहिती माध्यमांवरून मिळत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0