_202512281608098873_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
पुणे : (Sharad Pawar & Ajit Pawar) बारामतीतील विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याला गौतम अदानी हे सपत्नीक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
बारामतीत AI संशोधनाचं नवं केंद्र
उद्घाटनानंतर गौतम अदानी यांनी या केंद्राची पाहणी केली. हे सेंटर ऑफ एक्सलन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात शिक्षण, संशोधन आणि नवउद्योगांना चालना देणार आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण, संशोधकांना नवे प्रयोग आणि उद्योजकांना नवकल्पनांच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. त्यामुळे बारामतीसह महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.
दरम्यान, उद्घाटनावेळी गौतम अदानी यांनी शरद पवार यांना पुढे बोलावले. त्यावेळी शरद पवारांनी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांना पुढे केले. सध्या बारामतीत हा उद्घाटन सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे.