वैचारिक प्रगल्भतेचा कृतज्ञता सोहळा

28 Dec 2025 15:08:37

Dr. Ashok Modak
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ‘अभाविप’चे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, विधान परिषदेचे माजी आमदार, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सिद्धहस्त लेखक आणि विचारवंत डॉ. अशोकराव मोडक यांना, यंदाचा ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार आज डोंबिवली येथे आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देणारा हा लेख...
 
डॉक्टर अशोक गजानन मोडक यांना ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा अत्यंत सुप्रतिष्ठित ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला जाणे, ही त्यांच्या प्रगल्भ आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्वासाठी जितकी आनंदाची बाब आहे, तितकीच त्या सन्मानाची प्रतिष्ठा आणि उंची वाढवणारीही गोष्ट आहे. संशोधन, अध्यापन, लेखन, वक्तृत्व आणि विद्वत्ता या सर्व बाबतीत ख्याती, हे तर त्यांच्या लौकिकाचे ठळक पैलू आहेतच. कदाचित, त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे ती त्यांनी धारण केलेली जीवननिष्ठा. त्यांच्या बहुक्षेत्रीय कर्तबगारीला निखळ देशनिष्ठ आणि शुभशक्तिनिष्ठ दृष्टिकोनाचे अतिशय भक्कम अधिष्ठानही आहे.

Powered By Sangraha 9.0