ठाणे : (RG Cricket Club) शिवाजी पार्क येथे सुरु असलेल्या १९ वर्षांखालील शील्ड टी २० क्रिकेट स्पर्धेत ठाण्याच्या आरजी क्रिकेट क्लबने आर.ए.सी.सी.चा संघाला पराभूत करत विजय संपादन केला. आरजी क्लबचा गोलंदाज पवन प्रसादने ५ बळी घेतले. (RG Cricket Club)
हेही वाचा : मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाचा दिनदर्शिकेचे प्रकाशन
नाणेफेक जिंकून आरजी क्लबने (RG Cricket Club) प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पवन प्रसादच्या भेदक गोलंदाजी मुळे आर.ए.सी.सी.चा संपूर्ण संघ १४० धावांवर बाद झाला. दर्श आणि मुदितने अनुक्रमे २ बळी घेतले.
आरजी क्रिकेट क्लबने (RG Cricket Club) १५.३ षटकांत २ बळी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.फलंदाजीत समीरने फक्त ३५ चेंडूत ८७ धावा केल्या. दर्शने ५ चेंडूत १७ आणि शौर्यने ३२ चेंडूत २२ धावा केल्या. आरजी क्लबने ८ गडी राखून सामना जिंकला. राहुल गिरी आणि फिटनेस प्रशिक्षक राकेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.