ठाणे : मुरबाड-शहापूर तालुका रहिवासी संघाची २०२६ दिनदर्शिकेचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर, हिरकांत फर्डे, आदित्य नारायण पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष खंडूशेठ चौधरी, कार्याध्यक्ष भास्कर पवार, उपाध्यक्ष अनंत विशे, उपाध्यक्ष संतोष घावट, उपाध्यक्षा दर्शना सासे, उपाध्यक्षा दीपाली कराळे- देसले, सचिव कृष्णा निपूर्ते, सहसचिव विलास बेलवले, खजिनदार लहू देसले, सहखजिनदार बाळू गोडांबे तसेच मंडळाचे सर्व विश्वस्त, माजी अध्यक्ष, सल्लागार,संघटक, सदस्य आदींसह संपूर्ण कार्यकारणी उपस्थित होते.