झुबेर हंगरगेकरच्या चौकशीतून अल-कायदाचे दहशतवादी सर्व्हर्स उघड!

27 Dec 2025 20:28:05
 
Maharashtra ATS
 
मुंबई : (Maharashtra ATS investigations reveal Al-Qaeda using servers) महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अल-कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी कारवायांचा पर्दाफाश केला आहे. एटीएसने अल-कायदा संघटनेचे अफगाणिस्तानातून चालवले जाणारे सर्व्हर्स उघड केले आहेत. वेबसाईट आणि सोशल मीडियाचा वापर करून भारतातील तरुणांना कट्टरपंथी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एटीएसच्या (Maharashtra ATS) तपासातून समोर आले आहे.
 
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या झुबेर हंगरगेकरच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या तपासात अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमध्ये नोंदणीकृत अनेक ऑनलाइन ओळखपत्रे आणि खाते वापरात असल्याचे आढळून आले आहे. एटीएसच्या तपासानुसार, अल-कायदाकडून वेबसाईट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांमध्ये कट्टरपंथी विचारसरणी पसरवली जात होती. विशेष म्हणजे, थेट संपर्क लपवण्यासाठी हाँगकाँगचा वापर ‘राउटिंग हब’ म्हणून केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमानमधील काही व्यक्ती व नेटवर्कशी संबंधित संपर्कांचाही सखोल तपास सुरू आहे. अफगाणिस्तानस्थित सायबर नियंत्रण केंद्रांद्वारे भारतात सातत्याने ऑनलाइन प्रचार केला जात असल्याचेही एटीएस (Maharashtra ATS) आणि गुप्तचर यंत्रणांनी उघड केले आहे.(Maharashtra ATS)

 
Powered By Sangraha 9.0