"महापालिकेबाबत महायुतीत सकारात्मक चर्चा; लवकरच जागावाटप जाहीर होईल", मुख्यमंत्र्यांची ग्वाही

27 Dec 2025 18:40:31

CM DEVENDRA FADNAVIS
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ही चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच जागावाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)
 
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “जागावाटपाच्या संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. कोणताही तिढा राहणार नाही. सर्व महानगरपालिकांमध्ये महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवेल,” महायुतीमधील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वयाने चर्चा सुरू आहे. जागा वाटपाच्या चर्चा भाजपचे प्रमुख नेते रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार आणि अमित साटम या नेत्यांच्या माध्यमातून पुढे नेल्या जात आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (CM Devendra Fadnavis)
 
विविध महानगरपालिकांमधील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जागावाटपाचा निर्णय घेतला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जागावाटपाचा अंतिम आराखडा लवकरच समोर येणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. (CM Devendra Fadnavis)


 
Powered By Sangraha 9.0