मुंबई : (EPFO) केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेसाठी महत्त्वपूर्ण सुधारणांची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये ईपीएफओच्या नव्या भविष्य निधी भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. (EPFO)
या सुधारणांअंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ईपीएफओ कार्यालय प्रणाली विकसित करण्यात येणार असून, यामुळे नागरिकांना देशातील कोणत्याही प्रादेशिक कार्यालयात आपल्या तक्रारी आणि समस्यांचं निराकरण करता येणार आहे. (EPFO)
निष्क्रीय खात्यांमध्ये अडकलेले कर्मचाऱ्यांचे पैसे मोकळे व्हावेत यासाठी मिशन मोडवर केवायसी सत्यापन राबवण्यात येणार आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीच्या बचतीपर्यंत सहज पोहोच मिळणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम पारदर्शकता वाढणे, सेवा सुलभ होणे आणि कर्मचाऱ्यांचा ईपीएफओवरील विश्वास अधिक दृढ होण्यात दिसून येणार आहे. (EPFO)