दहशतवादविरोधी परिषदेचे अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन; दोन दिवसीय परिषदेत राष्ट्रीय सुरक्षेवर मंथन

26 Dec 2025 18:27:31

Amit Shah
 
नवी दिल्ली : (Amit Shah inaugurates the Counter-Terrorism Conference) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत आयोजित दहशतवादविरोधी परिषदेचे शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी उद्घाटन केले. दोन दिवस चालणाऱ्या या महत्त्वाच्या परिषदेत देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांवर तसेच दहशतवादामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर धोक्यांवर सखोल विचारमंथन केले जाणार आहे. (Amit Shah inaugurates the Counter-Terrorism Conference)
 
ही परिषद राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असून, ‘संपूर्ण सरकार’ (Whole of Government) या दृष्टिकोनातून दहशतवादविरोधात समन्वित आणि प्रभावी कारवाई करण्यासाठी विविध यंत्रणांमध्ये ताळमेळ साधण्यावर भर दिला जाणार आहे.या परिषदेत परदेशी अधिकारक्षेत्रातून पुरावे गोळा करणे, दहशतवादविरोधी तपासात डिजिटल फॉरेन्सिक्स आणि डेटा विश्लेषण, प्रभावी खटला व्यवस्थापन, कट्टरतावादाचा सामना करणे, गुप्तहेरगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी उद्भवणारे संमिश्र धोके, यांसह दहशतवादाशी संबंधित इतर विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.(Amit Shah inaugurates the Counter-Terrorism Conference) 
 
भविष्यातील धोरण ठरवण्यासाठी ठोस सूचना आणि रणनीती मांडणे, हे या परिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.(Amit Shah inaugurates the Counter-Terrorism Conference)
Powered By Sangraha 9.0