मुंबई : (Dhruv Rathee) प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीने अभिनेत्री जान्हवी कपूरवर निशाणा साधला आहे. बांगलादेशातील हिंदू तरुण दीपू चंद्र दास याच्या निर्घृण हत्येवर तीव्र निषेध व्यक्त केल्यानंतर ध्रुव राठीने फेक ब्युटीच्या नावाखाली हा निशाणा साधला आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर काय म्हणाली होती?
गुरुवारी दिनांक २५ डिसेंबरच्या रात्री अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये “बांगलादेशात जे घडत आहे ते अत्यंत अमानवी आहे. ही सरळसरळ कत्तल असून ही एकमेव घटना नाही. हा नरसंहार आहे. जर तुम्हाला या अमानुष मॉब लिंचिंगबद्दल माहिती नसेल, तर आधी त्याबद्दल वाचा, व्हिडिओ पाहा आणि प्रश्न विचारा. हे सगळं पाहूनही जर तुमच्या मनात राग निर्माण होत नसेल, तर हीच ती ढोंगी वृत्ती आहे जी आपल्याला काही कळण्याआधीच नष्ट करेल. आपण जगाच्या दुसऱ्या टोकावर घडणाऱ्या घटनांवर हळहळ व्यक्त करत राहतो, पण आपल्या आजूबाजूला आपल्याच भाऊ-बहिणींना जिवंत जाळले जात असताना आपण गप्प राहतो.”
पुढे जान्हवी म्हणाली, “जातीय भेदभाव आणि टोकाचा कट्टरपणा आपण बळी असो वा गुन्हेगार या प्रत्येक स्वरूपाचा निषेध झाला पाहिजे. अन्यथा आपण आपली माणुसकीच विसरू. आपण एखाद्या अदृश्य रेषेच्या दोन बाजूंवर आहोत असा भ्रम बाळगणारी प्यादे आहोत. हे ओळखा. स्वतःला ज्ञानाने सजग करा, जेणेकरून या सामुदायिक संघर्षात सतत गमावल्या जाणाऱ्या आणि दहशतीखाली जगणाऱ्या निरपराध जीवांसाठी तुम्ही ठामपणे उभे राहू शकाल.” असं म्हटलं आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूरने लिंचिंगकडे लक्ष वेधल्यानंतर काही तासांतच, ध्रुव राठीने "डार्क साइड ऑफ ब्युटी" नावाच्या एका युट्युब व्हिडिओची जाहिरात करणारी एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये थंबनेलमध्ये जान्हवी कपूरचा फोटो ठळकपणे दाखवण्यात आला आहे.
जान्हवीची थट्टा करण्याचा प्रयत्न
ध्रुव राठीच्या या व्हिडिओमध्ये बॉलीवूड कलाकरांच्या कॉस्मॅटिक ट्रिटमेंटवर लक्ष केंद्रीत केले असले तरी, त्या व्हिडिओच्या थंबनेलसाठी वापरलेल्या जान्हवीच्या फोटो उद्देश स्पष्ट दिसतोय. ध्रुव राठीने आधीचा आणि आताचा जान्हवीचा फोटो दाखवून तिची थट्टा करण्याचा प्रयत्न केला आहे.
ध्रुव राठीने अभिनेत्री जान्हवी कपूरच्या प्रतिक्रियेनंतर काहीच वेळात व्हिडिओ प्रसिद्ध केल्याने त्याचा हा प्रोपगंडा लगेच उघड झाला आणि यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.
जान्हवी कपूरने बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ पोस्ट केली. -जर्मन युट्यूबर ध्रुव राठीने तिच्यावर हल्ला करायला सुरुवात केली तो जिहादींसाठी काम करतो हे आता गुपित राहिलेले नाही. तो आता ते लपवण्याचा प्रयत्नही करत नाही.... अशी प्रतिक्रिया @MrSinha_ यांनी एक्सवर व्यक्त केली आहे.
बांगलादेशातील हिंदूंसाठी बोलणारी एक बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ध्रुव राठीने लगेचच तिच्या फोटोचा वापर करून तिच्या व्हिडिओमध्ये तिला कमी लेखले. किती आजारी, नीच आयुष्य, कंजर, लीचड इन्सान आहे तो. अशी प्रतिक्रिया @swatic12 यांनी एक्सवर व्यक्त केली आहे.