मुंबई : (Dr. Vishal Kadane) मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाच्या वतीने येत्या जानेवारीमध्ये शिक्षकांसाठी विशेष 'एआय लर्निंग वर्कशॉप' आयोजित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या नव्या क्षितिजाशी जोडणारा हा उपक्रम असून डॉ. विशाल कडणे (Dr. Vishal Kadane) यांच्या संकल्पनेतून ही मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत शिक्षकांना एआय आणि मशीन लर्निंगची मूलभूत माहिती, प्रभावी एआय प्रॉम्प्ट्स तयार करण्याची कला, अध्यापन आणि कंटेंट क्रिएशनमध्ये एआयचा वापर तसेच हाताळणीसह मिनी प्रोजेक्ट्स यांचा अनुभव मिळणार आहे. ही कार्यशाळा फक्त शिक्षकांसाठी असून नोंदणी करणे अनिवार्य आहे. सोबत दिलेला क्युआर कोड स्कॅन करून नोंदणी करायची आहे. (Dr. Vishal Kadane)
हेही वाचा : Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्रांकडून बाबुलनाथ मंदिराकडे लीजची प्रत सुपूर्द
डॉ. विशाल कडणे (Dr. Vishal Kadane) यांनी यापूर्वीही 'एआय फॉर ऑल' कार्यक्रम, सीबीएसई एआय अभ्यासक्रम, तसेच एआय सेंटर ऑफ एक्सलन्स यांसारखे उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात डिजिटल नवकल्पनांना चालना दिली आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून जन्मलेला हा नवा उपक्रम शिक्षकांना एआयचे ज्ञान देऊन अध्यापन अधिक परिणामकारक, आधुनिक आणि आकर्षक बनवेल, असे प्रवक्ते अनिल मुंढे यांनी सांगितले. (Dr. Vishal Kadane)