गाझासाठी मेणबत्त्या पेटवता! हिंदूंना मारले तेव्हा गप्प बसता! जर का मी रोहिंग्या बांगलादेशींना हुसकावलं, तेव्हाही गप्प बसा अन्यथा...!

25 Dec 2025 16:21:29

CM Yogi Adityanath

मुंबई : (CM Yogi Adityanath)
उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी २४ डिसेंबरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विविध मुद्द्यांवर उत्तर देताना विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी बांगलादेशातील हिंसाचार आणि बांगलादेशी - रोहिंग्या घुसखोरांच्या मुद्द्यावर भाष्य केले. (CM Yogi Adityanath)

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री योगी म्हणाले, “तुम्ही गाझाच्या मुद्द्यावर मेणबत्ती पेटवून मोर्चे काढता. मात्र जेव्हा पाकिस्तान किंवा बांगलादेशात एखाद्या हिंदूची हत्या होते, तेव्हा तुमचं तोंड बंद असतं. कारण तिथे मरणारा व्यक्ती हिंदू किंवा दलित असतो.” विरोधकांनी या घटनांचा निषेध करणारा ठराव मांडायला हवा होता, मृत व्यक्ती हिंदू आहे म्हणून तुम्ही बोलणार नाही, ही भूमिका योग्य नाही,” असे मुख्यमंत्री योगी यांनी विधानसभेत स्पष्ट केले.(CM Yogi Adityanath)

यावेळी त्यांनी बांगलादेशी - रोहिंग्या घुसखोरांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बाहेर काढण्यासाठी कारवाई करु, तेव्हा त्यांना पाठिंबा द्यायला पुढे येऊ नका. अनेक बांगलादेशींसाठी आधार कार्ड बनवण्याचे पाप झाले आहे. यावर आम्ही प्रभावी आणि कठोर कारवाई करू,” असा इशाराही त्यांनी दिला. योगी (CM Yogi Adityanath) पुढे म्हणाले की, "देशांतर्गत गुन्हेगारी वाढत असताना शेजारी देशांमध्ये निष्पाप हिंदू आणि शीखांवर अत्याचार होत आहेत, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे." (CM Yogi Adityanath)

Powered By Sangraha 9.0