Uddhav Thackeray : जसं बटेंगे तो कटेंगें आहे, तसं आपलं तुटू नका फुटू नका! मराठीचा वसा टाकू नका : उद्धव ठाकरे

24 Dec 2025 13:00:59
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : (Uddhav Thackeray) तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, असे भावनिक आवाहन शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्रीयांना केले. बुधवार, २४ डिसेंबर रोजी वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे आयोजित मनसे-शिवसेना (ठाकरे गट) संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मराठी माणूस, मुंबई आणि महाराष्ट्राच्या एकात्मतेचा मुद्दा ठामपणे मांडला. (Uddhav Thackeray)
 
हेही वाचा : Raj Thackeray : आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे; राज ठाकरे
 
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “मुंबईवर आणि महाराष्ट्रावर वाकड्या नजरेने पाहणारा, कपटी कारस्थानांद्वारे मुंबईला महाराष्ट्रापासून किंवा मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करणारा कोणीही असो, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत.”
 
हे वाचलात का ?:  Thackeray Brothers : आज मनसे-उबाठा युतीची अधिकृत घोषणा, आधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आदरांजली
 
ते पुढे म्हणाले, “आता जर चुकलात तर संपलात आणि जर फुटलात तर पूर्णपणे संपून जाल. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना सांगतो, तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा कधीही टाकू नका. हाच संदेश आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने महाराष्ट्राला देतो.” उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमक आणि भावनिक वक्तव्यामुळे युतीला वैचारिक अधिष्ठान मिळाल्याचे मानले जात असून, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही युती आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Uddhav Thackeray)
 
 
Powered By Sangraha 9.0