मुंबई : (Thackeray Brothers) मुंबई महानगरपालिकेसाठी उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे या ठाकरे बंधू प्रयोगाचा प्रारंभ अखेर बुधवारी झाला. दोन्ही नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आगामी निवडणूकांसाठी उबाठा-मनसे युतीची घोषणा केली. (Thackeray Brothers)
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही एकत्र आलोत ते एकत्र राहण्यासाठी, असे मी यापूर्वीच सांगितले होते. यापुढे कुणीही मराठी माणसाला मुंबईपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा खात्मा करण्याची शपथ घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत. मराठी माणसाला सांगतो की, आता जर तुटाल तर संपाल. त्यामुळे आता तुटू नका, असा संदेश मी या युतीच्या निमित्ताने देतो," असे ते म्हणाले. (Thackeray Brothers)
हेही वाचा : Uddhav Thackeray : जसं बटेंगे तो कटेंगें आहे, तसं आपलं तुटू नका फुटू नका! मराठीचा वसा टाकू नका : उद्धव ठाकरे
उर्वरित ठिकाणी लवकरच शिक्कामोर्तब
"उर्वरित महापालिकांमधील युतीवर आज किंवा उद्या शिक्कामोर्तब होईल. शरद पवार यांच्याशीही आमची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र रक्षणासाठी ही महाराष्ट्रप्रेमींची युती आहे," असेही ते म्हणाले. दरम्यान, यावेळी त्यांना महाविकास आघाडी अजूनही आहे का, असा प्रश्न विचारला असता "सगळे पक्ष बाहेर पडून आघाडीत आहे," असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले. (Thackeray Brothers)
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे मी माझ्या एका मुलाखतीत मी म्हटले होते. तिथून आमच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली. कोण किती जागा लढवणार हे मी तुम्हाला सांगणार नाही. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही जाहीर करतो. मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार. आज आम्ही मुंबईची युती जाहीर करत असून बाकी ठिकाणी जसे होईल तसे कळवले जाईल. ज्यांचे मुंबई आणि मराठी माणसावर प्रेम आहे, अशा सर्वांनी आमच्या पाठीमागे उभे राहावे, अशी माझी विनंती आहे," असे ते म्हणाले. (Thackeray Brothers)
हे वाचलात का ?: Raj Thackeray : आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे; राज ठाकरे
हा प्रयोग यशस्वी होणार?
मागच्या काही वर्षात उद्धव ठाकरे यांनी बदललेल्या विविध भूमिकांनंतर आता त्यांनी मनसेशी युती करण्याचा नवा प्रयोग केला आहे. मुंबई महानगरपालिकेत अस्तित्व टिकवण्यासाठीचा हा त्यांचा प्रयोग यशस्वी होणार की, शेवटचा प्रयोग ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. (Thackeray Brothers)