Raj Thackeray : आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे; राज ठाकरे

24 Dec 2025 12:54:44
 
Raj Thackeray
 
मुंबई : (Raj Thackeray) कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आमच्या एकत्र येण्याची सुरुवातच या विचारातून झाली, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केले. बुधवार, २४ डिसेंबर रोजी वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. (Raj Thackeray)
 
हेही वाचा : Thackeray Brothers : आज मनसे-उबाठा युतीची अधिकृत घोषणा, आधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आदरांजली
 
युतीतील जागावाटपाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “कोण किती जागा लढवणार, हा आकडा सध्या आम्ही जाहीर करणार नाही. यामागे ठोस कारण आहे.” याचे स्पष्टीकरण देताना त्यांनी टोला लगावत सांगितले, “राज्यात सध्या लहान मुलांना पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत, तशाच उमेदवार पळवणाऱ्या टोळ्याही सक्रिय आहेत.” राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, युतीतील जागावाटपाची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Raj Thackeray)
 
 
Powered By Sangraha 9.0