Devendra Fadnavis : ‘खोदा पहाड, चुहा भी नही निकला!’ ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका

24 Dec 2025 14:43:45
 
Devendra Fadnavis
 
मुंबई : (Devendra Fadnavis) आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-मनसे युतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या युतीवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड और चुहा भी नही निकला,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. (Devendra Fadnavis)
 
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही मोठं घडणार आहे.” ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, “त्यांचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड हा भ्रष्टाचार आणि स्वहिताचाच राहिला आहे. त्यामुळे यावेळी मुंबईची जनता त्यांच्या भावनिक आवाहनाला भुलणार नाही.”
 
हेही वाचा :  Thackeray Brothers: ठाकरे बंधूंच्या राजकीय प्रयोगाचा प्रारंभ; उबाठा-मनसे एकत्र लढणार
 
शिवसेना-मनसे युतीवर टीका करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांवरही उपरोधिक टिप्पणी केली. “मी सहज टीव्ही पाहत होतो. काही माध्यमं हा कार्यक्रम असा दाखवत होती की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. इकडून झेलेन्स्की निघाले, तिकडून पुतीन निघाले आणि युती झाली,” असा टोला त्यांनी लगावला.
 
ते पुढे म्हणाले, “निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावे लागते, तेच हे दोन्ही पक्ष करत आहेत. यापलीकडे याचा फार काही अर्थ काढण्याची गरज नाही. या युतीमुळे फारसा परिणाम होईल, असे मला वाटत नाही.” फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर गंभीर आरोप करत सांगितले की, “या मंडळींनी सातत्याने मुंबईकरांचा आणि मराठी माणसाचा विश्वासघात केला. मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप त्यांनी केलं आहे. त्यामुळे मराठी माणूस त्यांच्या सोबत नाही.” (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0