मुंबई : (Thackeray Brothers) महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Thackeray Brothers) यांच्यातील युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. ठाकरे बंधूंच्या या युतीची अधिकृत घोषणा उद्या, दुपारी १२ वाजता होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत ही माहिती दिली. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Thackeray Brothers) यांचा एकत्रित फोटो शेअर केला असून, कॅप्शनमध्ये केवळ“उद्या १२ वाजता” असे तीन शब्द लिहिले आहेत. या पोस्टमधूनच ठाकरे बंधू उद्या एकत्र येऊन युतीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना (उबाठा) आणि मनसे (Thackeray Brothers) यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू होती. जागावाटपाच्या मुद्द्यावर काही अडथळे होते, मात्र अखेर सर्व तिढे सुटल्याचे चित्र आहे. उद्याच्या घोषणेकडे संपूर्ण राज्याचे राजकीय लक्ष लागले असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या युतीला मोठे महत्त्व दिले जात आहे.