Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर दोष निश्चित; ८ जानेवारीला पुढील सुनावणी

23 Dec 2025 12:56:29
 
Santosh Deshmukh Case
 
मुंबई : (Santosh Deshmukh Case) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर न्यायालयाने आरोपींवर दोष निश्चित केला असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. आज न्यायालयात दोष निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार आहे. (Santosh Deshmukh Case)
 
हेही वाचा :  देश‘विरोधी’ पक्षनेता...
 
अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, "आजही आरोपींच्या वतीने दोष निश्चितीची सुनावणी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला." मात्र, न्यायालयाने तो प्रयत्न फेटाळत दोष निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणात सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद लक्षात घेता आरोपींविरोधात खटला चालवण्यास पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Case) प्रकरण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असून, दोष निश्चिती झाल्यामुळे आता प्रत्यक्ष साक्ष-पुराव्यांच्या सुनावणीला वेग येणार आहे. त्यामुळे ८ जानेवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Santosh Deshmukh Case)
 
 
Powered By Sangraha 9.0