मुंबई : (Navnath Ban) “आम्ही बोलते मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू बद्दल तर विरोधक बोलतात घोटाळ्याबद्दल.राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामे बघा आणि यावर बोला.बोलल पाहिजे तर पाठीतील खंजीर, पत्राचाळ लूट आणि वसुली रॅकेटवर बोला.साधूंच्या हत्येपासून खिचडी घोटाळ्यापर्यंतच्या सत्यावर राऊत गप्प का? कोविड संकटात मलिदा आणि आता लोकशाहीचे अश्रू हा तर दुटप्पीपणाचा कळस आहे. ठाकरेंच्या युतीने चित्र बदलेल हा भ्रम असून मुंबईकरांना अजूनही भ्रष्टाचार आठवतो."अशी टीका भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी मंगळवार दि.२३ रोजी नरिमन पॉईंट, मुंबई येथे केली.
“राज्यात आणि देशात लोकशाही सुरक्षित असून उबाठा गटात धोक्यात आहे आणि तिथे कार्यकर्ते बेवारस आहेत. नगरपालिका निवडणुकीत ज्यांनी एकही सभा घेतली नाही. ते आता निकालावर मात्र शंका घेत आहेत.घरात बसून निवडणूक आणि बाहेर येऊन आरोप अशी त्यांची भूमिका असून कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणं हीच उबाठाची परंपरा आहे. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांनी वाऱ्यावर सोडले आहेत."असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
हेही वाचा : Thackeray Brothers : मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब, राऊतांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
"महाविकास आघाडी नावापुरती असून जमिनीवर ती संपलेली आहे. काँग्रेसने फाट्यावर मारूनही आघाडीचे ढोल वाजवले जात आहेत.मुंबईत उंबरठे झिजवूनही आघाडी वाचणार नाही. याउलट भाजपमध्ये शिस्त आहे, नाराजीवर वरिष्ठ तोडगा काढतात.भाजपची परंपरा गोंधळाची नाही, संघटनेची आहे. नेतृत्वावर विश्वास हीच भाजपची ताकद असून भाजपमध्ये वाद नाही तर संवाद असतो”असेही बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
"ज्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याचाच राजकीय फटका त्यांना बसला आहे.हिरव्या मतांसाठी हिंदुत्वाचा सौदा केलेला जनता विसरलेली नाही.विधानसभेपासून पालिकांपर्यंत उबाठाचा पश्चात्तापाचा प्रवास सुरू आहे." असेही बन (Navnath Ban) यांनी प्रतिपादन केले.
हे वाचलात का ?: Santosh Deshmukh Case : ‘मला बोलायचंय!’ म्हणणाऱ्या वाल्मिक कराडचं तोंड कोर्टानेच केलं बंद; सुनावणीत नेमकं काय घडलं?
“महाराष्ट्र जिवंत आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळेच महायुतीला २२५ च्या आसपास जागा आणि भाजपाला १२५ जागांचा कौल मिळाला आहे.ही विकासावरची मोहर असून जिवंत महाराष्ट्राने तुमच्या भ्रष्टाचाराला नकार दिला आहे." असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
"हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर हीच राऊतांची खरी ओळख असून जे वंदनीय बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेसच्या दावणीला बांधले गेले. आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटून ज्यांनी गद्दारी केली ती गद्दारी मुंबईकर माफ करणार नाहीत."असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची परंपरा धोका देण्याची आहे. राज ठाकरेंनी सावध राहाव कारण २००८ ची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते.आज मिठी आणि उद्या पाठीत वार याचा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे मनसैनिकांना इशारा देतो की राऊतांच्या नादाला लागू नका” असे बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.