मुंबई : (Santosh Deshmukh Case) संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे. कराडचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्टपणे दिसून येत असल्याचे न्यायालयाने हे नमूद करत त्याला जामीन देण्यास नकार दिला. (Santosh Deshmukh Case)
हेही वाचा : Parth Pawar : पार्थ पवारांच्या सह्यांसह धक्कादायक कागदपत्र उघड, दमानिया-कुंभारांचा गंभीर आरोप
कराडने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तपासातील पुरावे आणि आरोपीची भूमिका लक्षात घेता जामीन मंजूर करता येणार नाही, असा ठाम निष्कर्ष न्यायालयाने काढला. या निर्णयामुळे कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, या प्रकरणात तपास यंत्रणांना मोठे बळ मिळाले आहे. (Santosh Deshmukh Case)