मुंबई : (Ravindra Chavan) भाजपाच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन उल्हासनगर येथील टी ओ के(टीम ओमी कलानी) पक्षाच्या राजेश टेकचंदानी यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सोमवार दि.२२ रोजी भाजपा परिवारात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार कुमार आयलानी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा : Ashish Shelar : "दऱ्या खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला,स्वार्थी "मशाली"ला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला", मंत्री आशिष शेलार यांची काव्यमय पोस्ट
तसेच माजी नगरसेविका तृप्तीताई भोईर यांच्या कल्याण पश्चिम, चिकणघर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या हस्ते सोमवार दि.२२ रोजी करण्यात आले.
हे वाचलात का ?: Santosh Deshmukh Case: कराड पुरता अडकला! न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
"भाजपा परिवाराच्या लोकाभिमुख कार्यशैलीला अधिक बळ देण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय नागरिकांसाठी सुशासनाचे प्रतीक ठरेल." असा विश्वास रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. याप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.