रेल्वेमंत्रालयाकडून किरकोळ भाडेवाढ जाहीर

22 Dec 2025 18:11:48
 
Indian Railway
 
मुंबई : ( Indian Railway ) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने वाढत्या संचालन खर्चाला सामोरे जात असताना आर्थिक समतोल साधण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी किरकोळ भाडेवाढ जाहीर केली आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीट दरवाढीची अधिकृत घोषणा केली असून नवे भाडे दि.२६ डिसेंबर २०२५पासून लागू होणार आहे. वाढत्या ऑपरेशनल खर्चाला सामोरे जात आर्थिक समतोल साधणे आणि भारतीय रेल्वेची आर्थिक शाश्वतता मजबूत करणे, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ही दरवाढ मर्यादित असली तरी एकूण तिकीट उत्पन्नावर परिणाम करणारी आहे .ही दरवाढ फक्त मूळ प्रवासी भाड्यावर लागू आहे. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट सरचार्ज, जीएसटी किंवा इतर कोणत्याही शुल्कात बदल नाही.
 
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, वाढत्या क्रियाकलापाच्या आणि मनुष्यबळ खर्चामुळे भाडे दरात सुधारणा करण्यात आली आहे. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात रेल्वेचा एकूण ऑपरेशनल खर्च सुमारे २.६३ लाख कोटी इतका झाला असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे. दैनंदिन प्रवासी आणि लोकल सेवांचा वापर करणाऱ्यांवर या दरवाढीचा फारसा परिणाम होणार नाही. १,००० किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासातही भाडेवाढ मर्यादितच राहणार आहे. ही दरवाढ संतुलन साधणारी आणि रणनीतिक निर्णय असल्याचे रेल्वेचे मत आहे.
 
हेही वाचा : चालत्या लोकलमधून १८ वर्षीय मुलीला खाली फेकले; व्हिडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय ?
 
नवे भाडे कसे असेल?
 
खालील प्रवासांवर कोणतीही दरवाढ नाही
 
-उपनगरी (लोकल) रेल्वे सेवा
 
-मासिक सीझन तिकीट
 
-२१५ किमीपर्यंतचा साधा (ऑर्डीनरी) वर्ग प्रवास
 
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी दरवाढ
 
-साधा वर्ग (२१५ किमीपेक्षा जास्त): प्रति किमी ०.०१ रुपये (1 पैसा) वाढ
 
- मेल व एक्सप्रेस गाड्या (नॉन-एसी व एसी): प्रति किमी ०.०२ रुपये (2 पैसे) वाढ
 
उदाहरण:
 
५०० किमी प्रवासासाठी नॉन-एसी डब्यात तिकीट सुमारे १० रुपयांनी महाग होईल.
 
 
Powered By Sangraha 9.0