Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

22 Dec 2025 16:31:22
 
Manikrao Kokate
 
मुंबई : (Manikrao Kokate) माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे. सोमवारी याप्रकरणाची सुनावणी पार पडली. (Manikrao Kokate)
 
राज्याचे माजी क्रीडामंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन नाशिकमधील शासकीय सदनिका आपल्या आणि भावाच्या नावाने लाटल्याच्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांना दोन वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्यानंतर कोकाटे (Manikrao Kokate) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांच्या अटकेला स्थगिती मिळाली होती, मात्र, कोर्टाने शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयाच्या विरोधात कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच या शिक्षेनंतर माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. (Manikrao Kokate)
 
हेही वाचा :  Ashish Shelar : "दऱ्या खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला,स्वार्थी "मशाली"ला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला", मंत्री आशिष शेलार यांची काव्यमय पोस्ट
 
याशिवाय त्यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार होती. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायलयाने माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, माणिकराव कोकाटे यांची आमदारकी कायम राहील, मात्र, आमदार म्हणून त्यांना कुठलेही अधिकार नसतील. तसेच या काळात त्यांना मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष असे कुठलेही घटनात्मक पद भुषवता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले. याबाबत राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती आहे. (Manikrao Kokate)
 
 
Powered By Sangraha 9.0