चालत्या लोकलमधून १८ वर्षीय मुलीला खाली फेकले; व्हिडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय ?

22 Dec 2025 17:25:57
Mumbai Local
 
मुंबई : ( Mumbai Local ) आता लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणं ही धोकादायक झालंय. नुकताच मुंबई लोकलमधील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ५० वर्षीय पुरुषाने १८ वर्षीय मुलीला चालत्या लोकलमधून चक्क खाली फेकले असून, घडलेल्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. दरम्यान ५० वर्षीय आरोपी शेख अख्तर हा आता पोलीसांच्या ताब्यात आहे.
 
पनवेल-सीएसएमटी लोकल मध्ये दि. १८ डिसेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. शेख अख्तर हा ५० वर्षीय पुरुष महिला विशेष डब्यात चढला. दरम्यान, एका १८ वर्षीय मुलीने त्याला दुसऱ्या डब्यांत जाण्याची विनंती केली. मात्र शेख अख्तरला त्या मुलीचा राग आला आणि चालत्या लोकलमधून त्याने तिला खाली ढकलून दिले. त्या जखमी अवस्थेत ही मुलीने तिच्या वडीलांना कॉल करून घडलेली घटना सांगितली. आतापर्यंत मिळालेल्या माहिनुसार, सध्या तरुणीवर उपचार सुरू आहेत.
 
हेही वाचा : Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश आणि कार्यालय उद्घाटन
दरम्यान, हा सर्व प्रकार घडत असताना, एका महिला प्रवाशाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काढला होता. जो आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आतापार्यंत अनेक लोकांनी आक्रोश व्यक्त केला आहे. त्यासोबतच संबंधित आरोपी सध्या अटकेत असल्याची माहिती मिळत आहे.
 
Powered By Sangraha 9.0