दिपू चंद्र दासची हत्या करणाऱ्यांना अटक मात्र.....बांगलादेशी लेखिकेचा पोस्टमध्ये खळबळजनक दावा

22 Dec 2025 16:58:47

मुंबई : ( Taslima Nasreen ) बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरूणाची हत्या करण्यात आल्यानंतर, भारतात निर्वासित असलेल्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी, एक्स माध्यामावर पोस्ट करत बांगलादेशचे अंतरिम मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी पैगंबरांचा अपमान केल्याच्या खोट्या आरोपावरून मारल्या गेलेल्या कोणत्याही हिंदूला आजतागायत न्याय मिळालेला नाही. तसेच बांगलादेशात हिंदूंची हत्या करण्याच्या उद्देशाने अफवा पसरवल्या जातात, असे लिहले आहे.
 
त्यांनी पोस्टमध्ये लिहले आहे की, मुहम्मद युनुस हा खूप चतुर माणूस आहे. दिपूच्या हत्यारांना अटक केल्याचे आज सांगितले जात आहे. मात्र, फेब्रुवारी महिन्यातील पुस्तक मेळ्यामध्ये माझे पुस्तक ठेवले म्हणून प्रकाशकावर हल्ला करण्यात आला, त्या हल्लेखोरांना अजूनही अटक नाही. त्यामुळे आज अटक केल्याचा बहाना करून त्यांना उद्या परत सोडण्यात येईल आणि याची बातमी देखील कुठे येणार नाही, याची युनुस काळजी घेईल.

मुहम्मद युनुसने जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कठोर दहशतवाद्यांना तुरुंगातून सोडले आहे. त्यामुळेच तो जिहादींचा आवडता माणूस आहे. युनुसच्या आदेशावरूनच हिंदू नेते चिन्मय दास कोणत्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात सडत आहेत. जर चिन्मय दास तुरुंगाबाहेर असते तर हिंदूंचे मनोधैर्य वाढले असते. परंतु युनुस तसे होऊ देणार नाहीत हे स्पष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 

 
Powered By Sangraha 9.0