Bangladesh Protest : बांगलादेशातील सध्याची परिस्थिती मानवतावादासाठी धोकादायक; विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांचे प्रतिपादन

22 Dec 2025 15:29:35
Bangladesh Protest
 
मुंबई : (Bangladesh Protest) बांगलादेशात हत्या करण्यात आलेला हिंदू युवक दीपु चंद्रदास याने 'सर्व देवांची नावे वेगळी असली तरी देव एकच आहेत' असे लिहिले होते. या गोष्टीला ईशनिंदा ठरवून दिपू दासला जिवंत जाळण्यात आले. ही भूमिका मानवतावादासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले. ते विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत आयोजित मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. (Bangladesh Protest)
 
हेही वाचा : Sharif Usman Hadi : बांगलादेशातील हिंसाचार वाढला; शरीफ उस्मान हादींच्या हत्येनंतर विद्यार्थी नेत्यावर गोळीबार
 
ते म्हणाले की, एका हिंदू युवकाची अमानुष हत्या ही एक घटना नसून, संपूर्ण बांगलादेशात अल्पसंख्याकांविरोधात वाढत चाललेली असुरक्षितता, भीती आणि सामूहिक छळाचे भयावह प्रतिबिंब आहे. ही परिस्थिती संपूर्ण जगासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. बांगलादेशातील (Bangladesh Protest) अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने व प्रभावी पावले उचलणे ही आंतरराष्ट्रीय समुदायाची नैतिक व मानवी जबाबदारी आहे. (Bangladesh Protest)
 
ते पुढे म्हणाले की, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या शक्ती, आंतरराष्ट्रीय माध्यमांचे काही वर्ग आणि जगभरातील मानवाधिकार मंच या मुद्द्यावर पूर्णपणे मौन का बाळगून आहेत. भारतविरोधी उस्मान हादी याला मुहम्मद युनूस यांनी राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार दिल्याचा त्यांनी तीव्र निषेध केला. या पत्रकार परिषदेत विहिंप कोकण अध्यक्ष डॉ. अजय संखे, प्रांत मंत्री मोहन सालेकर तसेच राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर उपस्थित होते. (Bangladesh Protest)
 
हे वाचलात का ?: Ravindra Chavan : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश आणि कार्यालय उद्घाटन  
 
बांगलादेशातील (Bangladesh Protest) हिंदू व इतर अल्पसंख्याकांची सुरक्षा, सन्मान आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने सर्व शक्य कूटनीतिक, राजकीय आणि मानवी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली. (Bangladesh Protest)
 
 
Powered By Sangraha 9.0