Ashish Shelar : "दऱ्या खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला,स्वार्थी "मशाली"ला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला", मंत्री आशिष शेलार यांची काव्यमय पोस्ट

22 Dec 2025 15:06:01
 
Ashish Shelar
 
मुंबई : (Ashish Shelar) सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या एक्स हँडलवरून सोमवार दि.२२ रोजी विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांची पोस्ट सध्या चर्चेत असून पोस्टमध्ये ते म्हणतात, "मराठी माणसा जागा हो.मारली तुम्ही हाक,आव्हानाला दिली पहा त्याने भरभरून साथ,दऱ्या खोऱ्यातून मराठी माणूस पेटून उठला,स्वार्थी "मशाली"ला आईस्क्रीमच्या कोनासारखा फेकला, "इंजिना"चे तर निशाण मिटले तुमच्या अहंकाराला चटणीसारखे ठेचले !मराठी माणसाचे हे यश पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले !! (Ashish Shelar)
 
हेही वाचा : Santosh Deshmukh Case: कराड पुरता अडकला! न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
 
तुम्ही पाच वर्षांनी उठता, तो सदैव असतो जागा ,तुमचे हल्ली चाललेय काय ? तुमचे तुम्ही बघा
काँग्रेसच्या अफवा गॅंगमध्ये सहभागी होता.उघड उघड औरंगजेब फॅनक्लब चालवता."तुतारी"तून जातीपातीचे विष पेरता.तुम्हाला काय वाटते, मराठी माणसाला हे कळत नाही? (Ashish Shelar)
 
म्हणून तो तुमच्या दारी हल्ली वळत नाही !
नगरपालिकांमध्ये जे घडले तसेच मुंबईसह पालिकांमध्ये घडेल
मराठी माणूस तुम्हाला मोठ्या "सन्मानाने" पाडेल !!
शून्य अधिक शून्य बेरीज शून्य हा गणिती नियम खरा ठरेल !!"
 
 
Powered By Sangraha 9.0