मुंबई : (Ameet Satam) "कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा रंग बदलू देणार नाही.आणि येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत १५० जागा महायुती जिंकणारच आहे.महायुती पूर्णपणे भक्कम असून मुंबईचा महापौर खान होऊ देणार नाही."असे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी रविवार दि.२१ रोजी केले. वसंत स्मृती, दादर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Ameet Satam)
वसंत स्मृती भाजपा कार्यालय, दादर येथे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुक २०२६ साठी मुंबई भाजपा कार्यालयाच्या वॉररुमचे उद्धाटन भाजपा राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री श्री शिवप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी निवडणूक संचलन समितीची बैठक पार पडली.यात मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पुढील रणनीती ठरवण्यात आली.यावेळी मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल,मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम, (Ameet Satam) आमदार अतुल भातखळकर, आमदार पराग शहा, आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर,निवडणूक संचालन समिती सदस्य किरण शेलार यांसह मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (Ameet Satam)