डोंबिवली : (Agri Festival) संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात यंदा हजारो नागरिकांच्या विक्रमी उपस्थितीने रंगलेल्या २१ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाची (Agri Festival) शुक्रवारी थाटात सांगता झाली. महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आगरी समाजाच्या भविष्यासाठी व गुणवंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यंदा प्रथमच ५० गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा उपक्रम सुरू करण्यात आल्याबद्दल महोत्सवात (Agri Festival) मान्यवरांनी व्यक्त केला.(Agri Festival)
मुंबई, ठाण्यासह रायगड जिल्ह्यात सर्वप्रथम २००४ मध्ये डोंबिवली येथे आगरी युथ फोरमच्या वतीने आगरी महोत्सव (Agri Festival) सुरू झाला होता. यंदा महोत्सवाचे (Agri Festival) २१ वे वर्ष होते. त्यानिमित्ताने नागरिकांसाठी आगरी खाद्य संस्कृती, परंपरेचे दर्शन घडविण्याबरोबरच विविध कार्यक्रम करण्यात आले. या कार्यक्रमांना यंदा हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १२ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या आठ दिवसांच्या उत्सवाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला.(Agri Festival)
या वेळी व्यासपीठावर महोत्सवाचे कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस गुरुनाथ म्हात्रे, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, विश्वनाथ रसाळ, प्रकाश भंडारी, दिलीप देसले, संतोष संते, कांता पाटील, भानुदास भोईर, जयेंद्र पाटील, अशोक पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पाटील, विनायक पाटील, सदानंद म्हात्रे, प्रवीण पाटील, सल्लागार ज्येष्ठ नेते गंगाराम शेलार, प्रभाकर चौधरी, विजय पाटील, सुभाष चं. म्हात्रे, दत्ता वझे, बंडू पाटील, गजानन मांगरुळकर, चंद्रकांत पाटील, डॉ. दिनेश म्हात्रे, राम पाटील, सुरेश जोशी, रंगनाथ ठाकूर, नंदू शां. म्हात्रे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. (Agri Festival)
हेही वाचा : Bharatiya Mazdoor Sangh : बाळकृष्ण पुराणिक यांचे कार्य इतरांना नेहमीच प्रेरणादायी - अनिल ढुमणे
आगरी समाजाबरोबरच अन्य समाजालाही बरोबर घेऊन जाणारा हा उत्सव यंदा विक्रमी ठरला, याबद्दल नागरिकांचे आभार मानण्यात आले. २१ वर्षांच्या काळात सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने आगरी संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यापुढील काळातही ही परंपरा कायम राहील, असा संकल्प समारोपावेळी करण्यात आला.(Agri Festival)
२१ वा आगरी महोत्सव (Agri Festival) समिती व आगरी युथ फोरमचे सर्व पदाधिकारी व सदस्य, युवा पिढी आणि आगरी समाजासह इतर सर्व समाजाच्या पाठिंब्यामुळे यश मिळाले. समाजाला प्रेरणा देणाऱ्या संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे भव्य स्मारक साकारण्यासाठी कार्य करणार आहोत, अशी भावना अध्यक्ष शरद पाटील यांनी व्यक्त केली.(Agri Festival)
गुणवंताचा सन्मान
आगरी महोत्सवात (Agri Festival) यंदा स्वर्गीय हरिश्चंद्र पाटील स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन उसाटणे येथील नवनाथ किसन मढवी, पिंपळास येथील डॉ. संजय हनुमान नागावकर, स्व. गोविंद चौधरी स्मृती आगरी क्रीडा रत्न पुरस्कार देऊन कु. सृष्टी प्रवीण पाटील, कु. मंदार सतीश म्हात्रे यांचा गौरव करण्यात आला. तर स्वर्गीय नकुल पाटील स्मृती साहित्य पुरस्कार देऊन उरण येथील अॅड. प्रा. चंद्रकांत चांगु मढवी, भादवड येथील सदानंद गणपत म्हात्रे, डोंबिवली येथील अनंत धर्मा भोईर, अलिबाग येथील नंदेश मनोहर गावंड यांना गौरविण्यात आले.(Agri Festival)