Tejashree Karanjule : अंबरनाथ मध्ये तेजश्री करंजुले पाटील यांच्या गळ्य़ात नगराध्यक्ष पदाची माळ, शिवसेनेला धक्का

21 Dec 2025 20:59:08
Tejashree Karanjule
 
कल्याण : (Tejashree Karanjule) अंबरनाथमध्ये सुशिक्षित चेह:याला पसंती देत मतदारांनी भाजपा आणि आठवले गटच्या उमेदवार सीए तेजश्री करंजुले-पाटील (Tejashree Karanjule) यांच्या गळ्य़ात नगराध्यक्ष पदाची माळ घातली आहे. भाजपाच्या तेजश्री (Tejashree Karanjule) यांना ५४ ,क्८७ मते मिळाली असून शिवसेनेच्या मनिषा वाळेकर यांना ४७७१५मते मिळाली आहेत. तेजश्री यांनी मनिषा यांना ६३७१ मताधिक्याने पराजित केले आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाने बाजी मारल्याने शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का आहे.(Tejashree Karanjule) 
 
हेही वाचा : BJP's victory in Vidarbha : विदर्भात भाजपची सरशी
 
अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक महायुतीतील घटकपक्ष भाजपा आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणो लढली. भाजपाने आरपीआय आठवले गटाशी युती केली होती. या निवडणूकीत खरी चुरस भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षातच होती. गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ येथे शिवसेनेची सत्ता राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे पराडे येथे जड असल्याचे मानले जात होते. पण मतमोजणीला सुरूवात झाली त्यानंतर तेजश्री (Tejashree Karanjule) या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. तेजश्री (Tejashree Karanjule)  यांनी घेतलेली आघाडी पाहता हळूहळू पक्षाचे कार्यकर्ते मतदान केंद्राच्या बाहेर जमू लागले. तेजश्री (Tejashree Karanjule) यांचा विजय निश्चित होताच भाजपाने विजयाचा जल्लोष केला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर असलेल्या तेजश्री यांनी शेवटर्पयत आघाडी टिकवून ठेवत नगराध्यक्ष पद खेच्चून आणले.(Tejashree Karanjule)
 
Powered By Sangraha 9.0