BJP : भाजपच महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष

21 Dec 2025 17:30:36
BJP
 
मुंबई : (BJP) भाजप (BJP) हा सर्व जातींचा, सर्व समाजांचा आणि सर्व भौगोलिक विस्तार असलेला पक्ष झाला आहे. महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष भाजपच (BJP) आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूकांच्या निकालावर दिली आहे.(BJP)
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्राच्या जनतेने भाजप (BJP) आणि महायुतीला प्रचंड मोठे समर्थन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. एकूण निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष हे महायुतीचे असतील, असे भाकीत मी यापूर्वीच केले होते. जनतेने तसाच कौल दिला असून भाजप हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. जवळपास भाजपचे (BJP) १२९ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून आले आहेत. नगरसेवकांच्या पदांमध्ये भाजपने एक नवीन रेकॉर्ड तयार केला आहे. २०१७ साली आमचे १६०२ नगरसेवक होते आणि आता त्याच्या दुपटीपेक्षा जास्त ३३२५ नगरसेवक भाजपचे (BJP) निवडून आले आहेत. एकूण नगरसेवकांच्या संख्येपैकी ४८ टक्के एकट्या भाजपचे नगरसेवक निवडून आले असून आम्हाला प्रचंड मोठे जनसमर्थन निवडून आले आहेत. आमचे सहयोगी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही पक्षांनी चांगली कामगिरी केली असून त्यांचे अभिनंदन करतो."(BJP)
 
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय
 
"आम्ही एकप्रकारे विधानसभेच्या कामगिरीची आम्ही पुनरावृत्ती केली आहे. पहिल्यांदाच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वातील ही निवडणूक असून त्यात मोठे यश मिळाले आहे. या निवडणूकीत रवींद्र चव्हाण, पूर्व अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मेहनत करून चांगला समन्वय साधला. पक्ष आणि पक्षाच्या संघटनेत खूप चांगला संवाद स्थापित झाला आणि एक अभूतपूर्व विजय मिळाला आहे. २०१७ पेक्षाही मोठा विजय आम्हाला मिळाला असून गेल्या २०-२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतका मोठा विजय कुणालाच मिळाला नाही. यासाठी मी नागरिकांचे आभार मानतो," असेही ते म्हणाले.(BJP)
 
हेही वाचा : Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात आमदार अतुल भातखळकर यांचे निषेध आंदोलन
 
टीम भाजपचा हा विजय
 
"या निवडणूकीत मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही सभेत एखाद्या व्यक्तीविरोधात, पक्षाविरोधात किंवा नेत्याच्या विरोधात बोललो नाही. मी केवळ विकासावर मते मागितली. आम्ही काय केले याचा रेकॉर्ड सांगितला, आम्ही काय करणार आहोत याची ब्लू प्रिंट मांडली आणि त्याला मतदारांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत आम्हाला निवडून दिले. भारताच्या इतिहासातील ही पहिली निवडणूक असेल ज्यात एखाद्या पक्षाच्या मुख्यमंत्री कुणावर सुतभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो. एकप्रकारे लोकांनी आमच्या विकासकामांना दिलेली ही पावती आहे. देशात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि एनडीएबद्दल असलेल्या सकारात्मकतेचा विशेष फायदा आम्हाला झाला. विशेषत: केंद्रीय मंत्री अमित शाह, जे.पी. नड्डा, कार्याध्यक्ष नितीन नवीन या संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाने आमच्यावर विश्वास दाखवून निवडणूकीची जबाबदारी दिली होती. आम्ही सगळे मिळून ती अत्यंत चांगल्याप्रकारे पार पाडू शकलो. रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचंड दौरा करून समन्वय साधला. तसेच प्रत्येक विभागातील नेत्यांनी त्या त्या विभागात चांगल्याप्रकारे समन्वय केला. सगळ्या मंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने जबाबदारी पार पडली. संघटना आणि मंत्रिमंडळ असे सगळे लोक सामुहिक प्रयत्न करत होते. त्यामुळे टीम भाजपचा हा विजय आहे," असेही ते म्हणाले.(BJP)
 
कार्यकर्त्यांच्या निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला न लावणे हा करंटेपणा
 
"या निवडणूकीत महायुतीचाच विजय होणार आहे, हे विरोधी पक्षातील नेत्यांना लक्षात आले होते. त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत. आता आपण हरलो हे लोकांना लक्षात आले तर पुढे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी होईल, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आम्ही फार सिरीयसली घेतले नाही, हे सांगायला ते मोकळे आहे. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. भाजप (BJP) आणि महायुती निवडणूकीत पूर्णपणे उतरली. मी स्वत: अगदी १० हजार लोकसंख्येच्या गावात गेलो. कारण जे कार्यकर्ते विधानसभा आणि लोकसभेत आपल्याला निवडून आणतात, त्यांच्या निवडणूकीत आपण आपली प्रतिष्ठा पणाला न लावणे हा करंटेपणा आहे. हार जीत होत असते पण त्यांच्याकडून काम करून घ्यायचे आणि त्यांची वेळ आल्यावर आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी पळ काढण्याची पद्धत योग्य वाटत नाही. भाजपमध्ये (BJP) आम्ही असे करत नाही. आम्ही हरल्यानंतर पळालो नाही आणि जिंकल्यानंतरही आम्ही माखलो नाही," असेही मुख्यमंत्री म्हणाले.(BJP)
"नागपूर जिल्ह्यात आम्हाला खूप चांगले यश मिळाले असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे यात विशेष श्रेय आहे. ज्या नगरपालिकांमध्ये आम्हाला यश मिळू शकले नाही, त्याची आम्ही कारणमिमांसा करू. पुढच्या काळात निवडून आलेल्या सगळ्या शहरांतील लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ असे विकासाचे कार्य आम्ही करून दाखवू. ही शहरे बदलावी, इथे चांगला विकास व्हावा, असा आमचा प्रयत्न असेल."(BJP)
 
हे वाचलंत का ? : Calligraphy In Modi Script : मोडी लिपीतील सुलेखनाचा दक्षिण कोरियामध्ये सन्मान
 
पक्ष हा विना दाराचाच असावा
 
“पक्षाची दारे कुठल्या समजाकरिता किंवा व्यक्तींकरिता बंद असू नये. पक्ष हा विना दाराचाच असला पाहिजे. फक्त प्रवेश देत असताना ती व्यक्ती योग्य आहे का, पक्षाला फायद्याची आहे का, हे बघितले पाहिजे. आज पक्षाने काही प्रवेश दिले असतील तर त्याचा फायदाच झाला आहे. पण सुधीर मुनगंटीवार यांना कुठली ताकद कमी पडली असल्यास त्याची भरपाई महानगरपालिका निवडणूकीत देऊ आणि पूर्ण ताकदीने चंद्रपूरची महानगरपालिका निवडून आणू. जनतेच्या मनात काय आहे, हे या निकालांमुळे स्पष्ट झाले आहे. महायुतीला नगरपालिकेपेक्षाही जास्त चांगले निकाल महानगरपालिकेत मिळतील. महानगरपालिकेत याहीपेक्षा आमची चांगली कामगिरी असेल,” असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.(BJP)
 
 
Powered By Sangraha 9.0