डोंबिवली : (Bharatiya Mazdoor Sangh) भारतीय मजदूर संघाची (Bharatiya Mazdoor Sangh) त्याग, तपस्या, आणि बलिदान ही घोषणा आपल्या जीवनात पूर्ण उतरवणारे आणि भारतीय मजदूर संघाचे काम सातत्याने 50 वर्ष अथक निरंतर करणारे बाळासाहेब एक आदर्श कार्यकर्ते आणि स्वयंसेवक होते. त्यांचे कार्य आज इतरांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल अशी भावना भारतीय मजदूर संघ (Bharatiya Mazdoor Sangh) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड अनिल ढुमणे यांनी व्यक्त केली.(Bharatiya Mazdoor Sangh)
भारतीय मजदूर संघाचे (Bharatiya Mazdoor Sangh) जेष्ठ कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक स्व. बाळकृष्ण पुराणिक यांचे दि. 9 डिसेंबर 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानिमित्ताने 20 डिसेंबर रोजी गणेश मंदिर डोंबिवली येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 50 पेक्षा जास्त वर्ष भारतीय मजदूर संघाचे (Bharatiya Mazdoor Sangh) सातत्यपूर्ण काम करणारे बाळासाहेब यांचे व्यक्तिमत्व हे चतुरस्त्र होते. स्वतः वीज उद्योगात काम करत असताना देखील औद्योगिक क्षेत्र, संरक्षण, बांधकाम, घरेलू, नगरपालिका, अंगणवाडी, मलेरिया फवारणी, आरोग्य रक्षक, सहकारी बँका , परिवहन इत्यादी सर्वच क्षेत्रात त्यांनी काम केले. अत्यंत मृदू स्वभाव आणि कार्यातील सातत्य कामगारांप्रती असणारी प्रेमभावना , गरिबांच्या प्रति असणारी कणव यामुळे त्यांनी आपला मोठा चाहता वर्ग आणि अनेक कार्यकर्ते निर्माण केले. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या आठवणींच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या स्मृती जागृत केल्या.(Bharatiya Mazdoor Sangh)
हेही वाचा : Calligraphy In Modi Script : मोडी लिपीतील सुलेखनाचा दक्षिण कोरियामध्ये सन्मान
यावेळी भारतीय मजदूर संघ (Bharatiya Mazdoor Sangh) महाराष्ट्राचे महामंत्री किरण मीलगिर, ज्येष्ठ नेते अण्णा देसाई, केंद्रीय कार्यकर्ते मोहन येनुरे , संघाचे (Bharatiya Mazdoor Sangh) कल्याण जिल्हा कार्यवाह नितीनजी शिंत्रे , डोंबिवली शहर संघ चालक शिवाजीराव पाटील, ज्येष्ठ कार्यकर्त्या शोभा अंबरकर, बाळासाहेबांचे पुत्र स्वप्निल पुरानिक, सुनबाई वर्षा पुराणिक आणि त्यांच्या पत्नी यांच्यासह सुभागतत दास, चंद्रकांत नेवे पालघर, घरेलू कामगार बेबीनंदा कांबळे , विमा उद्योगाचे प्रकाश गाडगोळी, प्रतिरक्षा मजदूर संघ अंबरनाथ अध्यक्ष राजेश साळुंखे, ठाणे जिल्हा सहकारी बँक कर्मचारी महासंघ जनरल सेक्रेटरी प्रकाश खाडीलकर, कल्याण जनता सहकारी बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंद रेडे, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनचे आर शिंदे, संजय कारंडे , बीएमएस ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष भरत गोडांबे, ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी आपले विचारातून बाळासाहेब पुराणिक यांना श्रद्धा सुमन अर्पित केले. कार्यक्रमाचा समारोप प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे यांनी केला. या निमित्ताने बाळासाहेब पुराणिक यांच्या जीवनावर आधारित छोटा माहितीपट प्रसिद्ध करण्यात आला. बाळासाहेबांनी आपल्या कामातून एक कार्यकर्त्यांचा आदर्श निर्माण केलेला आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण ही काम करूया अशा प्रकारचे सार्वत्रिक भावना या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.(Bharatiya Mazdoor Sangh)
या कार्यक्रमाला संघ (Bharatiya Mazdoor Sangh) स्वयंसेवक, राष्ट्रसेविका समिती, घरेलू कामगार, सहकारी बँका, संरक्षण उद्योग, एस टी महामंडळ, वीज उद्योग , नगरपालिका रेल्वे आधी विविध उद्योगातील कार्यकर्ते आणि बाळासाहेब पुराणिक यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव श्री विलास आंबेकर यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.(Bharatiya Mazdoor Sangh)