PM Narendra Modi : मतपेढ्यांसाठी काँग्रेसने घुसखोरांना मोकळे रान दिले, आम्ही त्यांना शोधून काढत आहोत : पंतप्रधान

20 Dec 2025 20:30:20
PM Narendra Modi
 
नवी दिल्ली : (PM Narendra Modi) काँग्रेसने नेहमी आसामविरोधी काम केले, मतपेढ्यांसाठी घुसखोरांना दरवाजे खुले केले, आसामच्या लोकसंख्येची रचना या प्रकारामुळे पूर्णपणे बदलली. यामुळे आसामच्या सुरक्षेशी तडजोड झाली. ते म्हणाले, “मोदी (PM Narendra Modi) काँग्रेसच्या चूका सुधारत आहे, आज हिमंतांचे सरकार मेहनतीने आसामला देशविरोधी शक्तींपासून मुक्त करत आहेत. बेकायदा घुसखोरांची ओळख पटवून त्यांना हद्दपार केले जात आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी त्यांनी गुवाहाटी इथे लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे लोकार्पण केले. आसामधील दळणवळण, अर्थव्यवस्थेचा विस्तार आणि जागतिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने मैलाचा टप्पा गाठला आहे.(PM Narendra Modi)
 
मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “भारतरत्न भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळींचा संदर्भही त्यांनी दिला. विशाल ब्रह्मपुत्रा नदीचा काठ उजळून निघेल, अंधाराची प्रत्येक भिंत तुटून पडेल आणि हाच राष्ट्राचा संकल्प आणि पवित्र प्रतिज्ञा आहे, त्यामुळे हे निश्चितपणे घडून येईल असाच त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. भूपेन हजारिका यांच्या गीतातील ओळी म्हणजे केवळ गीत नसून आसामवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक थोर आत्म्याचा तो एक पवित्र संकल्प होता आणि आज हा संकल्प पूर्ण होत आहे” असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे ब्रह्मपुत्रेचा प्रवाह कधीच थांबत नाही, त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्यातील आपल्या सरकारांच्या नेतृत्वाखाली आसाममधील विकासाची धारा अविरतपणे सुरूच असल्याचे ते म्हणाले. लोकप्रिय गोपीनाथ बर्दोलोई विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन हे याच वचनबद्धतेचा पुरावा असल्याचे ते म्हणाले, तसेच या टर्मिनल इमारतीबद्दल त्यांनी आसाम आणि देशातील जनतेचे अभिनंदन केले.(PM Narendra Modi)
 
हेही वाचा : Nitish Kumar : मुस्लीम महिला एकवटल्या, नितिश कुमारांविरोधात देशभरातून तक्रारी दाखल करण्याची होतेय मागणी 
 
पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) या परिस्थितीची तुलना भूतकाळाशी केली आणि सांगितले की, मागील सरकारांच्या अजेंड्यावर आसाम आणि ईशान्य भारताचा विकास कधीच नव्हता. त्यांनी नमूद केले की, त्या सरकारांमधील नेते म्हणायचे की, "आसाम आणि ईशान्येकडे जातंय तरी कोण?" आणि या प्रदेशात आधुनिक विमानतळ, महामार्ग आणि चांगल्या रेल्वे मार्गांची गरज काय, असा प्रश्न ते उपस्थित करायचे. या मानसिकतेमुळेच विरोधकांनी अनेक दशके या संपूर्ण क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. विरोधी पक्षांनी सहा-सात दशकांत केलेल्या चुका त्यांच्या नेतृत्वाखाली एक एक करून सुधारल्या जात आहेत, असे नमूद करून मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, विरोधी पक्षनेते ईशान्येला भेट देवोत वा न देवोत, पण मी जेव्हा आसाम आणि या भागात येतो तेव्हा त्यांना आपल्याच लोकांमध्ये असल्यासारखी आपुलकी जाणवते.(PM Narendra Modi)
 
या नवीन टर्मिनल इमारतीमुळे गुवाहाटी आणि आसामची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे वर्षाला सव्वा कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील, असे सांगून यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक आसामला भेट देऊ शकतील आणि भक्तांना माँ कामाख्या देवीचे दर्शन घेणे सुलभ होईल असे त्यांनी सांगितले. या नवीन विमानतळ टर्मिनलमध्ये पाऊल ठेवल्यास वारसा सोबत 'विकास' या मंत्राचा खरा अर्थ स्पष्टपणे दिसून येतो, असे त्यांनी सांगितले. आसामचा निसर्ग आणि संस्कृती लक्षात घेऊन विमानतळाची रचना करण्यात आली असून आतमध्ये हिरवळ आणि 'इनडोअर फॉरेस्ट' सारखी व्यवस्था असल्याचे पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) सांगितले.
 
 https://x.com/narendramodi
 
आसाम आणि ईशान्य भारताला विकासापासून दूर ठेवणाऱ्या तत्कालीन काँग्रेस सरकारांवर टीका करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, यामुळे देशाला सुरक्षा, एकता आणि अखंडतेच्या दृष्टीने मोठी किंमत मोजावी लागली. विरोधी पक्षांच्या राजवटीत अनेक वर्षे हिंसाचार फोफावला होता, मात्र गेल्या १०-११ वर्षांपासून तो संपवण्याचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. एकेकाळी ज्या ईशान्य भारतात हिंसाचार आणि रक्तपात होत होता, तिथे आज ४जी आणि ५जी तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल संपर्कप्रणाली पोहोचत आहे. एकेकाळी हिंसाग्रस्त म्हणून ओळखले जाणारे जिल्हे आता आकांक्षी जिल्हे म्हणून विकसित होत आहेत आणि येत्या काळात हेच प्रदेश औद्योगिक कॉरिडॉर बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(PM Narendra Modi)
  
Powered By Sangraha 9.0