मुंबई : (Thackeray brothers) मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची घोषणा जागावाटपाच्या तिढ्यामुळे सध्या रखडली असल्याची माहिती माध्यमांवरून मिळत आहे. युती जाहीर करण्यापूर्वी सर्व जागावाटपावर स्पष्टता हवी, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि मनसे यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यावर येऊनही घोषणा पुढे ढकलली गेली आहे. (Thackeray brothers)
हेही वाचा : Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता अडकला? आरोप निश्चितीसाठी कोर्टाची डेडलाईन
दरम्यान माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये जागांवरून दोन्ही पक्षांत मतभेद निर्माण झाले आहेत. विशेषतः ज्या मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाचे (Thackeray brothers) विद्यमान आमदार आहेत, त्या ठिकाणी मनसेने तीन जागांची मागणी केल्याने तिढा निर्माण झाला आहे. भांडूप, माहीम, विक्रोळी आणि शिवडी हे मतदारसंघ सध्या चर्चेचे केंद्रबिंदू ठरले असून, याठिकाणी जागावाटपावर एकमत होत नसल्याचे चित्र आहे. नेत्यांच्या पातळीवर हा पेच अद्याप सुटलेला नसल्याने, अखेरचा निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Thackeray brothers) यांच्या थेट भेटीतच होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातूनच युतीच्या घोषणेचा मार्ग मोकळा होईल, असे म्हटले जात आहे.