डोंबिवली : (Ravindra Chavan) शहरातील नागरिकांशी निगडीत विकासकामांना पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर कोणी ओळखीचा व्यक्ती, शेठ-नेता नाही तर पारदर्शकपणे काम करणारी व्यक्ती महापौर पदी असणे गरजेचे आहे असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी व्यक्त केले.(Ravindra Chavan)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने शुक्रवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. शहराच्या पश्चिमेतील भागशाळा मैदानात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, संतोष केणे, समीर चिटणीस, नरेंद्र (नाना ) सूर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार, राहूल दामले, संदीप पुराणिक, मंदार हळबे, शैलेश धात्रक, शशिकांत कांबळे, अनमोल म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.(Ravindra Chavan)
चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गतिमान करण्याचे काम झाले आहे. हा वेगाने विकास करताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि प्रयास या चार ही गोष्टींचा मेळ त्यांच्या कामामध्ये आहे. केरळसारख्या डाव्या विचारसरणीच्या राज्यामध्ये वेगळा विचार केला आणि विकासाला मतदान करण्यात आले. तिथल्या महानगरपालिकेत नागरिकांनी भाजपाला केवळ कौल दिला नाही. तर भाजपाचा महापौर ही बसवला. जर केरळसारखे राज्य असा विचार करत आहे याचा अर्थ लक्षात घ्या. काळाची गरज ओळखून तुम्हाला विकासाला मतदान करायचे आहे असे त्यांनी सांगितले.(Ravindra Chavan)
हेही वाचा : Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी - राज्य निवडणूक आयुक्त
कपिल पाटील म्हणाले, भाजपाच्या निवडणूकीच्या प्रचाराला डोंबिवलीतून सुरूवात झाली आहे. हे प्रदेशाध्यक्षांचे होम पीच आहे. त्यामुळे दुसरी कोणतीही व्यक्ती याठिकाणी जास्त काळ बॅटींग करू शकत नाही. आणि बॅटीग केली तर जास्त धावा काढू शकत नाही. ज्यांचे होम पीच असते त्याला धावा कश्या काढायच्या, बॉल कसा मारायचे हे बरोबर माहिती असते. विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस, नागरिकांच्या समस्याचे उत्तर म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. राष्ट्रीय पक्षाने आजर्पयत कधीही ठाणे जिल्ह्यातील प्रदेशाध्यक्ष दिला नाही. पण भाजपाने दिला आहे. त्यामुळे होम पीचवर तर महापौर आपल्याच आला पाहिजे असे ही सांगितले.(Ravindra Chavan)
जगन्नाथ पाटील म्हणाले, शहरात फिरताना कार्यकर्त्यांची भावना युतीमध्ये निवडणूक लढू नये अशीच आहे. कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना लढू द्या. कार्यकर्ता लढतो म्हणूनच आमचे सारखे लोक आमदार, खासदार होतात असे सांगितले.(Ravindra Chavan)
भूलथापांना बळी पडू नका
निवडणूकामध्ये भूलथापांना बळी पडू नका. अनेक जण वेगवेगळ्य़ा पध्दतीने भूलथापा देतील, अनेक जण गाडयांच्या काचा ही खाली करत नाही. अनेक जण निवडणूकीच्या पार्श्र्वभूमीवर तुमच्यासमोर येतील पण 24 तास तुमच्यासोबत असणाऱ्या रवी चव्हाणला (Ravindra Chavan) विसरू नका अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांना आवाहान केले.(Ravindra Chavan)