शशी थरूरांकडून बांगलादेश सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

20 Dec 2025 18:53:23

Shashi Tharoor

 
मुंबई : ( Shashi Tharoor ) बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू युवकाची हत्या करण्यात आल्यानंतर काँग्रेस लोकसभा सदस्य शशी थरूर यांनी शोक व्यक्त केला आहे. X वर पोस्ट शेअर करत ते म्हणाले की, बांगलादेशात सध्या सुरू असलेल्या झुंडशाहीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना अत्यंत वेदनादायक आणि असह्य अशी आहे.
 

अमानुष गुन्हेगारांच्या हातून या गरीब हिंदू व्यक्तीच्या झालेल्या मृत्यूवर शोक व्यक्त करत त्यांनी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत.


ते म्हणाले की, या हत्येतील आरोपींना शिक्षा देण्यासाठी सरकारने नेमकी कोणती ठोस पावले उचलली आहेत? तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कोणती प्रभावी उपाययोजना केली आहे? सरकारने यावर उत्तरे द्यावीत.
 

 
Powered By Sangraha 9.0