Sanjay Raut : संजय राऊत पुन्हा ‘शिवतीर्था’वर! ठाकरे- मनसे युतीत जागावाटपावर निर्णायक चर्चा?

20 Dec 2025 13:54:46
Sanjay Raut 
 
मुंबई : (Sanjay Raut) मुंबईतील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी हजेरी लावली आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून राऊतांनी ही दुसर्‍यांदा राज ठाकरेंची भेट घेटली आहे. या बैठकीसाठी मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितिन सरदेसाई, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून अनिल परब, वरुण सरदेसाई आणि सुरज चव्हाण हे नेतेही ‘शिवतीर्था’वर दाखल झाले आहेत. या साऱ्यांच्या उपस्थितीमुळे जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी ही बैठक असल्याचे संकेत मिळत आहेत. (Sanjay Raut)
 
हेही वाचा :  Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता अडकला? आरोप निश्चितीसाठी कोर्टाची डेडलाईन
 
दरम्यान, कालच अनिल परब यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज संजय राऊत (Sanjay Raut) स्वतः चर्चेसाठी पुढे आल्याने, ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीबाबतच्या हालचाली निर्णायक टप्प्यावर आल्याचे मानले जात आहे. मात्र, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने युतीची अधिकृत घोषणा रखडलेली आहे.
 
हे वाचलात का ?:  Thackeray brothers : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा रखडली! राज ठाकरेंची ठाम भूमिका म्हणाले, जागावाटपावर स्पष्टता...
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाच्या मतदारसंघांवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद कायम असून, त्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीनंतरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र जागावाटपाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आता युतीच्या घोषणेवर देखील प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचेच दिसत आहे. (Sanjay Raut)
 
 
Powered By Sangraha 9.0