मुंबई : (Ramesh Chennithala) आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर मैदानात उतरणार असल्याची स्पष्ट घोषणा काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांनी केली आहे. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोन्ही पक्षांना थेट आव्हान देत काँग्रेस मुंबईकरांसमोर स्वतंत्र पर्याय मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी गेल्या चार वर्षांतील महापालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. प्रदूषणाची गंभीर समस्या, मुंबईतील रुग्णालयांची दुरवस्था आणि प्रचंड भ्रष्टाचार यामुळे सामान्य मुंबईकर त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतः गरीब आणि दुर्बल घटकांना कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. (Ramesh Chennithala)
हेही वाचा : Ambarnath EVM Machine : अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड! मतदानावेळी गोंधळ
यावेळी चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आणि काँग्रेस पक्ष सच्चे देशभक्त, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. मुंबईकरांसमोर लवकरच काँग्रेसचा जाहीरनामा आणि आरोपपत्र सादर करण्यात येईल, तसेच मुंबई महानगरपालिका अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पद्धतीने चालवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. (Ramesh Chennithala)