मुंबई : (Alia Bhatt) आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असून, प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींकडूनही या चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे. करण जोहरपासून श्रद्धा कपूरपर्यंत अनेक नामवंत कलाकारांनी चित्रपटातील कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले आहे. मात्र, रणवीरला खास मित्र म्हणवणाऱ्या आलीया भट्टने मात्र, धुरंधर चित्रपटाबद्दल कमालीचा अलिप्त भूमिका घेतली. याच कारणास्तव आलीया भट्ट (Alia Bhatt) सध्या ट्रोल होत आहे. रणवीर सिंगसोबत ‘गली बॉय’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलेल्या आलिया (Alia Bhatt) आणि रणवीर यांच्यातील मैत्री सर्वांनाच माहित आहे. दोघांनीही यापूर्वी ‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय शोमध्ये त्यांच्या मैत्रीबद्दल खुलेपणाने भाष्य केले होते.(Alia Bhatt)
असे असतानाही, ‘धुरंधर’च्या यशानंतर आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी अद्याप सार्वजनिकरित्या चित्रपटाचे किंवा रणवीर सिंगच्या कामगिरीचे कौतुक केलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही जण या मौनाचा अर्थ काढत प्रश्न उपस्थित करत आहेत की, ही मैत्री खरंच तितकी घट्ट आहे का, तर काहींच्या मते आलियांचे मौन हे वैयक्तिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे असू शकते. दरम्यान, आलिया भट्ट (Alia Bhatt) किंवा त्यांच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हे मौन नेमके कशामुळे आहे, याबाबत सध्या केवळ चर्चा आणि अंदाजच लावले जात आहेत. मात्र, ‘धुरंधर’च्या यशामुळे रणवीर सिंगच्या कारकिर्दीतील हा टप्पा विशेष ठरत असून, सेलिब्रिटी प्रतिक्रिया आणि त्यावरील चर्चांमुळे चित्रपट आणखी चर्चेत आला आहे.(Alia Bhatt)
हेही वाचा : Ram Gopal Varma Praises Aditya Dhar : ‘धुरंधर’ ठरतोय गेम-चेंजर; राम गोपाल वर्मांच्या कौतुकाने आदित्य धर भावूक
धुरंधर हा चित्रपट पाकिस्तानातील भारतीय हेरांच्या शौर्यकथेवर आधारित आहे. मात्र, आलिया भट्टचा (Alia Bhatt) अशाच एका पठडीतला सिनेमा दिग्दर्शक शिव रवैल दिग्दर्शित अल्फा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. ज्यात आलिया (Alia Bhatt) अशाच प्रकारच्या स्पायची भूमिका साकारणार आहे. मात्र, ज्यात ती यात अनिल कपूर, बॉबी देओल अशी स्टारकास्ट असणार आहे. मात्र, धुरंधरने एक विक्रम रचल्याने आलीयाच्या या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळणार हा प्रश्न आहे. धुरंधर चित्रपटाला मिळणारा तुफान प्रतिसाद हा भारतात आहे, मात्र. आखाती मुस्लीम देशांनी त्यावर बंदी आणली आहे. पाकिस्तानचा या सिनेमामुळे तिळपापड झाल्याचे दिसून आले. हेच कारण आलियाने (Alia Bhatt) अद्याप रणवीरच्या या चित्रपटाचे कौतूक करणे टाळले, असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान रणवीरचे कौतूक करुन आलीयाला या वादातून सुटता आले असते मात्र, तिने अद्याप तशी कुठलीही भूमिका घेतलेली नसल्याने तिच्यावर टीका होत आहे.(Alia Bhatt)