Nitish Kumar : मुस्लीम महिला एकवटल्या, नितिश कुमारांविरोधात देशभरातून तक्रारी दाखल करण्याची होतेय मागणी

20 Dec 2025 19:25:10
Nitish Kumar
 
नवी दिल्ली : (Nitish Kumar) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्याविरोधात पीडीपीच्या नेत्या इल्तिजा मुफ्तींनी यांनी तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर महिलेला नियुक्ती पत्र देताना तिचा हिजाब खेचल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोठीबाग पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी सार्वजनिक ठिकाणी एका मुस्लीम महिलेचा हिजाब खेचत तिला अपमानित केले आहे. हा तिचा गंभीर अपमान असून संविधानाच्या मुल्यांचा भंग आहे. या प्रकरणात पोलीसांनी तत्काळ एफआयआर नोंदवावी.”(Nitish Kumar)
 
१५ डिसेंबर रोजी नितिश कुमार (Nitish Kumar)  यांनी एका सरकारी कार्यक्रमात नवनियुक्त डॉक्टरांना पत्र देत असताना फोटो काढण्यासाठी एका महिलेचा हिजाब त्यांनी खेचला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरुन वादंग उठला. यानंतर देशभरात नितिश कुमार (Nitish Kumar) यांच्याविरोधात एफआयआर करण्याची मालिका सुरू आहे.(Nitish Kumar)
इल्तिजा मुफ्तींनी तक्रारीत म्हटले आहे की, “आजूबाजूचे लोक ही घटना घडत असताना हसत होते. आनंदी होते, या प्रकरणारुन त्या महिलेच्या सन्मानावर झालेला हा हल्ला आहे. देशात मुस्लीमांचे जाणीवपूर्वक राजकीय आणि वंचितीकरण सुरू असताना अशा प्रकारची घटना चिंताजनक आहे”, असा आरोपही त्यांनी केला.(Nitish Kumar)
 
हेही वाचा :  शशी थरूरांकडून बांगलादेश सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
 
या प्रकरणात नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर चोहोबाजूनी टीका होत आहे. राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री महिलांचा अवमान करत आहेत, एका संविधानिक पदावर राहून अशा प्रकारे कृत्य करणे हे व्यक्तीला शोभा देत नाही, अशी टीका आरजेडी नेता मृत्युंजय तिवारी यांनीही केली आहे.(Nitish Kumar)
 
दंगल सिनेमातील अभिनेत्री झायरा वसीमनेही याबद्दल एक्स पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “महिलेची प्रतिष्ठा आणि इभ्रत ही खेळण्याची गोष्ट नाही. एका सार्वजनिक व्यासपीठावर तर मुळीच नाही. एखाद्या महिलेचा हिजाब ओढताना बेफिकीरपणे हसरा चेहरा पाहणं हे संतापजनक होतं.”, असेही ती म्हणाली.
 
Powered By Sangraha 9.0